वाढत्या शहरीकरणासह इतर अनेक गोष्टींमुळे मातीचं प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर वाढतं आहे. मातीचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०१५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष जाहीर केलं आहे. त्यानिमित्त –
आपल्या संस्कृतीत पंचमहाभूते- पृथ्वी, जल, अग्नी, हवा आणि अंतरिक्ष यांना केंद्रस्थान आहे. ते मानवी जीवनाशी निगडित असे मूलभूत घटक आहेत. वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यामुळे अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. या पाच मूलभूत घटकांतील हवा आणि जल प्रदूषित झालेले आहे. वाहणाऱ्या नद्या/ नाले/ ओढे यांचे रूप आता सांडपाण्याच्या नाल्यात झालेले आहे. औद्योगिकीकरण, वाढती वाहने यामुळे हवाही प्रदूषित झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी ती धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त आहे. यामुळे समाजाला अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. या पंचमहाभूतातील एक घटक – पृथ्वी- जमीन हीपण प्रदूषणाच्या विळख्यात अडकत गेली आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे महानगरे वाढत आहेत त्यामुळे सुपीक जमिनी हळूहळू कमी होऊ लागल्या आहेत. रासायनिक खते, कीटकनाशके यांचा अमर्याद वापर यामुळे जमिनीतील नसíगक सुपीकता कमीकमी होत आहे. याच्या जोडीला सिमेंट, प्लॅस्टिक यांसारख्या अविघटनशील पदार्थाच्या प्रदूषणामुळे आणि मातीतील पालापाचोळा या वनस्पती जीवन फुलणाऱ्या जैविक घटकांचा तसेच जमिनीतील सूक्ष्म जिवांचा, गांडुळांचा ऱ्हास झाल्याने जमीन मृतवत झाली आहे. याचा परिणाम धान्योत्पादनावर होऊ शकतो. वाढती लोकसंख्या आणि घटते धान्योत्पादन हा एक गंभीर धोका आहे. मानवाच्या अन्नाच्या गरजेच्या पूर्ततेसाठी जमीन हा मूलभूत घटक आहे. जमीन सुपीक असेल तर कृषिउत्पन्न भरपूर मिळेल. नसíगक सुपीकता जोपासणे आणि सुपीक जमिनीसाठी रासायनिक खते वापरणे यात मूलभूत फरक आहे. याची जाणीव, यातील धोके जनतेस करून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या २० डिसेंबर २०१३ ला झालेल्या ६८ व्या आमसभेत २०१५ हे आंतरराष्ट्रीय मृदा- माती वर्ष (इंटरनॅशनल इयर ऑफ सॉइल) म्हणून साजरे करण्याचा ठराव संमत केला. याची सर्व जबाबदारी अन्न आणि कृषी संघटनेने (फूड अँड अ‍ॅग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन) घ्यावी यासाठी वैश्विक मृदा भागीदारी (ग्लोबल सॉइल पार्टनरशिप)च्या चौकटीत आणि शासन, संयुक्त राष्ट्र संघाच्या वाळवंटीकरणाच्या विरुद्ध कार्यरत असलेल्या गटाने हा उपक्रम राबवावा असे ठरले. संयुक्त राष्ट्र संघ तिच्या सहयोगी संस्थांच्या साहाय्याने गेली अनेक वष्रे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरी करीत आहे. वर्षांची निवड ही त्या वर्षी मागे झालेल्या ठळक घटना, जसे नवीन शोध, व्यक्तीचा जन्म वा मृत्युदिन याचा विचार करून वर्ष जाहीर केले जाते. त्या विषयाचे महत्त्व आमजनतेस पटवून त्याबद्दल सामाजिक जाणीव निर्माण करणे हा आहे असे वर्ष साजरे करण्याचा हेतू.
भूमी हा नसíगक व्यवस्थेतील एक मूलभूत आणि महत्त्वाचा घटक असून त्याचे मानवी जीवनाच्या उन्नतीत महत्त्वाचे योगदान असल्याची जाणीव आम जनतेस करून देण्याचा हेतू आहे. अन्नसुरक्षा आणि अत्यावश्यक पर्यावरणीय कार्य यात असलेल्या मातीच्या महत्त्वाच्या योगदानाची जाण आणि ज्ञान करून देणे हे मृदा वर्ष साजरे करण्यामागचे उद्दिष्ट आहे.
सॉइल सायन्स सोसायटी ऑफ अमेरिका, वैश्विक मृदा भागीदारी आणि इतर संघटनांमध्ये समन्वय राखून हे वर्ष साजरे करणार आहे. माती हा एक सीमित नसíगक स्रोत असून त्याची मानवी जीवनाच्या काळात पुनíनर्मिती होत नाही. अन्न, पशुआहार, इंधन, नसíगक धागे, स्वच्छ पाणी पुरवठा, प्राणी वनस्पतींना लागणारी पोषणद्रव्ये आणि अनेक पर्यावरणीय कार्यात मातीचा सहयोग मोलाचा आहे. माती वर्ष साजरे lp28करताना खालील उद्दिष्टे ठेवली आहेत.
* मानवी जीवनात भूमीच्या महत्त्वाचे आणि तिच्या योगदानाबाबतची जाणीव समाज आणि निर्णय घेणाऱ्यांना करून देणे.
* अन्नसुरक्षा, वातावरणातील बदलाशी जुळवून घेणे, त्यावर उतार पाडणे, अत्यावश्यक जीवसृष्टी, गरिबीचे उच्चाटन आणि आधारभूत विकास यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भूमीबद्दलची जनतेस जाणीव करून देणे.
* भूमीस्रोतांचे संरक्षण आणि आधारभूत व्यवस्थापनासाठी परिणामकारक धोरणे आणि कार्यवाहीस पािठबा देणे.
* आधारभूत भूमी व्यवस्थापनाच्या उपक्रमात भांडवली गुंतवणुकीस उत्तेजन देऊन वेगवेगळ्या भूमी उपयोजकात आणि लोकसंख्या गटास सक्षम भूमी विकास देखभाल करणे.
* विकास उद्दिष्टांच्या संदर्भात सक्षम पुढाकार.
* संकलन आणि जागतिक, विभागीय आणि स्थानिक स्तरावर नियंत्रण यासाठी जलद क्षमता वृद्धीत वाढ करणे.
आपला देश कृषिप्रधान असल्याने आणि यातील अनेक समस्यांना आपण सामोरे जात आहोत म्हणून याचे महत्त्व समस्त जनतेस पटवून देऊन आपण सर्वानी एकदिलाने कामास लागू या.

माती आणि घोषणा
आंतरराष्ट्रीय वर्षांच्या काळात सॉइल सायन्स सोसायटी ऑफ अमेरिकेने प्रत्येक महिन्यासाठी विषय जाहीर केला आहे. या विषयातून मातीचे मूल्य समाज आणि नसíगक वातावरणाच्या विविध पलूंतून दिसून येते.
जानेवारी २०१५ – जीवनास माती देते आधार
फेब्रुवारी २०१५ – शहरी जीवनास मातीचा आधार
मार्च २०१५ – शेतीस आधार मातीचा
एप्रिल २०१५ – माती पाणी साठविते आणि स्वच्छ करते
मे २०१५ – मूलभूत आराखडे आणि इमारतींना मातीचा आधार
जून २०१५ – माती आणि मनोरंजन
जुलै २०१५ – माती हे जीवन आहे
ऑगस्ट २०१५ – माती आरोग्याचा आधार
सप्टेंबर २०१५ – नैसर्गिक वातावरणाचे रक्षण करते माती
ऑक्टोबर २०१५ – माती आणि आपण वापरत असलेली उत्पादने
नोव्हेंबर २०१५ – माती आणि हवामान
डिसेंबर २०१५ – संस्कृती समाज आणि माती
विजय देवधर – response.lokprabha@expressindia.com

bse sensex rise 599 points to settle at 73088
तेजीवाल्यांची पुन्हा सरशी; तणाव निवळल्याने सेन्सेक्सची सहा शतकी दौड
indian economy marathi news
UNCTAD: भारताची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये किती टक्क्यांनी वाढणार? संयुक्त राष्ट्राचा अहवाल जाहीर; व्याजदराचाही उल्लेख!
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण