07 July 2020

News Flash

राशिभविष्य : दि. १ ते ७ मे २०२०

चंद्र आणि शुक्र या दोन स्त्री ग्रहांच्या केंद्र योगामुळे भावनांवर ताबा ठेवणे आवश्यक असेल.

(संग्रहित छायाचित्र)

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र आणि शुक्र या दोन स्त्री ग्रहांच्या केंद्र योगामुळे भावनांवर ताबा ठेवणे आवश्यक असेल. कला व तंत्रज्ञान या क्षेत्रात विशेष रस घ्याल. नोकरी-व्यवसायात अडचणींवर मात करत पुढे जावे लागेल. तांत्रिक समस्या दूर करण्यात यश येईल. सहकारी वर्गाकडून अपेक्षित साहाय्य मिळणे कठीण जाईल. जोडीदाराला डोळे आणि घसा यांचा  त्रास होईल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवणे आपल्या हातात असेल. रागावर नियंत्रण ठेवा. पित्ताचा त्रास होईल.

वृषभ गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रगती कराल.  नोकरी-व्यवसायात नवे प्रबोधनकारक विचार मांडाल. वरिष्ठांना आपले म्हणणे समजावून सांगाल. सहकारी वर्गाची उत्तम साथ मिळेल. नवी प्रणाली, कामाचे नवे स्वरूप सहकारी वर्ग लवकर आत्मसात करेल. जोडीदाराच्या कामाला गती यायला वेळ लागेल. कुटुंब सदस्यांसाठी वेळ आणि पसा अधिक खर्च करावा लागेल. त्वचाविकार बळावतील. इन्फेक्शन होऊ देऊ नका.

मिथुन चंद्र आणि बुधाच्या समसप्तम योगामुळे व्यवहारज्ञानाचा योग्य उपयोग कराल. नोकरी-व्यवसायात सामंजस्याने आगेकूच कराल. सहकारी वर्गाकडून आवश्यक कामे करवून घ्याल. वरिष्ठ व कनिष्ठांचा मेळ घालून द्याल. जोडीदाराला भावनिक आधाराची गरज भासेल. त्याच्या समस्येवर उपाय शोधाल. कुटुंब सदस्यांना शिस्तीचे पालन सक्तीचे कराल. वेळप्रसंगी धाकही दाखवाल. उष्णतेचे विकार बळावणार नाहीत याची दक्षता घ्याल.

कर्क दशम स्थानातील रवी-बुधाच्या युती योगामुळे कामातील चतुराई वाढेल. ज्ञानापेक्षा व्यवहारज्ञान उपयोगी पडेल. नोकरी-व्यवसायातील वरिष्ठांचे मार्गदर्शन कामी येईल. सारासार विचार न करता कोणताही निर्णय अंतिम ठरवू नका. आणीबाणीच्या परिस्थितीत जोडीदाराचे धर्य वाखाणण्याजोगे असेल. जोडीदाराचा संकल्प आणि संयम समाजोपयोगी कार्यात फारच उपयुक्त ठरेल. कुटुंब सदस्यांची मदत मिळेल. मनोधर्य सोडू नका.

सिंह भाग्य स्थानातील बुध-हर्षलच्या युती योगामुळे निर्णायक वेळी प्रगल्भतेने आपले विचार मांडाल. बुधाची बुद्धी आणि हर्षलच्या धाडसी वृत्तीचा योग्य समन्वय दिसून येईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रांतील अडचणीवर मात करणे कठीण जाईल. संघर्ष करून गोष्टी मिळवाव्या लागतील. कुटुंबात एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होईल. कामाच्या व्यापात पाठीच्या मणक्याकडे दुर्लक्ष करू नका.

कन्याआत्माकारक रवी आणि मनाचा कारक चंद्र यांच्या षडाष्टक योगामुळे केलेली मेहनत वाया जाण्याची शक्यता! नोकरी-व्यवसायात हाती घेतलेल्या कामात अडीअडचणी येतील. वरिष्ठांना आपले म्हणणे पटवून देणे सोपे नाही याची प्रचीती येईल.  जोडीदाराच्या मदतीने कुटुंब सदस्यांचे प्रश्न सोडवाल. वातावरण शांत ठेवा. अनावश्यक चर्चा टाळा. हाडे आणि सांधे यांचे आरोग्य जपण्यासाठी आहार, व्यायाम व औषधोपचार आवश्यक!

तूळ  चंद्र आणि नेपच्युन या दोन जलतत्त्वाच्या ग्रहांच्या समसप्तम योगामुळे भावनेच्या आहारी जाण्याची शक्यता! नोकरी-व्यवसायात अचानक निर्णयात बदल करावे लागतील. वरिष्ठांच्या मताचा मान ठेवणे इष्ट! सहकारी वर्गाच्या अरेरावीला शांतपणे सामोरे जावे. जोडीदाराच्या विचारांना जोड द्याल. त्याचे म्हणणे कुटुंबाच्या हिताचे ठरेल. कौटुंबिक समस्यांवर उपाय योजताना प्रेम, जिव्हाळा याबरोबर शिस्तीचेही पालन कराल. आतडय़ाचे आजार बळावू देऊ नका.

वृश्चिक शनी आणि चंद्र या दोन भिन्न गुणधर्माच्या ग्रहांच्या नवपंचम योगामुळे कल्पनाशक्ती आणि कार्यशक्तीचा विकास होईल. नोकरी-व्यवसायात चिकाटी, सातत्य आणि संयमाने काम कराल. सहकारी वर्गाची अडचणीच्या काळात चांगली साथ लाभेल. जोडीदाराशी सूर जुळतील. एकमेकांना समजून घेऊन भविष्यातील आराखडे मांडाल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. कुटुंब सदस्यांच्या भावनांची कदर कराल. अतिविचारांमुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

धनू चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे विचार आणि भावनांचा उत्तम समतोल राखाल. नोकरी-व्यवसायात नव्या योजना अमलात आणाल. वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. संस्थेतर्फे समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हाल. सहकारी वर्गाला योग्य मार्गदर्शन कराल. शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी पार पाडाल. जोडीदाराच्या कलागुणांना वाव मिळेल. दोघे मिळून गरजूंना मदत कराल. कुटुंब सदस्यांचे आíथक प्रश्न सोडवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

मकर चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती बळावेल. नोकरी-व्यवसायात रेंगाळलेली कामे हळूहळू मार्गी लावाल. वरिष्ठांचा पािठबा मिळेल. सहकारी वर्गाकडून चांगली साथ मिळेल. शेजारपाजाऱ्यांना मदत कराल. जोडीदाराचेही साहाय्य मिळेल. कौटुंबिक वातावरण ताणतणावयुक्त असेल. भावनांवर ताबा ठेवाल. पित्त, उष्णतेचे विकार त्रासदायक ठरतील. वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. घरगुती उपचारही उपयोगी पडतील.

कुंभ रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेल्या कामांना वेग येईल. यश, कीर्ती आणि मानसन्मान मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विचारांना, कल्पनांना सर्वाची मान्यता मिळेलच असे नाही. सहकारी वर्गाकडून कामात अडचणी येतील. जोडीदाराच्या कर्तबगारीमुळे त्याचा अभिमान वाटेल. कौटुंबिक वातावरणात उत्साहवर्धक ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. मानसिक तणावामुळे निराश व्हाल. धीर सोडू नका.

मीन शुक्र-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे नव्या कल्पना सुचतील. लेखन, वाचन, काव्य यात मन रमेल. नोकरी-व्यवसायात अडीअडचणींवर बुद्धिवादाने मात करण्याचा प्रयत्न कराल. वरिष्ठांचे मत मान्य करावे लागेल. जुन्या परिचयातील ज्येष्ठ वरिष्ठांशी संपर्क साधाल. सहकारी वर्गाकडून अपेक्षित काम पूर्ण करून घ्याल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात त्याच्या कर्तृत्वाचा प्रभाव पाडेल. आरोग्य चांगले राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 6:13 am

Web Title: astrology from 1st to 7th may 2020 dd70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. २४ ते ३० एप्रिल २०२०
2 राशिभविष्य : दि. १७ ते २३ एप्रिल २०२०
3 राशिभविष्य : दि. १० ते १६ एप्रिल २०२०
Just Now!
X