07 March 2021

News Flash

राशिभविष्य : २२ जानेवारी ते २८ जानेवारी २०२१

ऊर्जादायक रवी आणि कर्माचा कारक शनी यांच्या युतीयोगामुळे भरपूर मेहनत घेऊन कामे पूर्ण होतील.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष ऊर्जादायक रवी आणि कर्माचा कारक शनी यांच्या युतीयोगामुळे भरपूर मेहनत घेऊन कामे पूर्ण होतील. कष्टाचे चीज होण्यास विलंब लागेल. नोकरी-व्यवसायात आपली कर्तबगारी सर्वांसमोर येईल. सहकारी वर्गातील बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग करून घ्याल. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. योग्यतेप्रमाणे त्याला मोबदला मिळेल. मुले अडचणींवर मात करून आपल्या मार्गावर प्रगती करतील. फुप्फुसाच्या तक्रारी निर्माण होतील. वेळेवर उपाय करावेत.

वृषभ रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे मेहनतीचे चीज होईल. कष्टाचे फळ उशिरा मिळेल. नोकरी-व्यवसायात आपले विचार इतरांपुढे प्रभावीपणे मांडाल. सहकारी वर्गाकडून  उत्तम साहाय्य मिळेल. परंतु त्यासाठी आपली बरीच ऊर्जा खर्ची पडेल. महत्त्वाच्या कामांचा सतत मागोवा घ्यावा लागेल. लहानशी चूक देखील महागात पडेल. जोडीदाराचे अंदाज चुकतील. त्याची चिडचिड वाढेल. थोडे सांभाळून घ्यावे. कौटुंबिक समस्यांचा गुंता सोडवताना नाती जपा. उत्सर्जनाचे त्रास वाढतील.

मिथुन चंद्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे आपण बुद्धिवादी असूनही भावना आणि नाती जपण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घ्याल. नोकरी-व्यवसायात अडचणींची मालिका तोडून हिमतीने पुढे जावे लागेल. सहकारी वर्गात ताणतणाव निर्माण होईल. जोडीदाराचे त्याच्या कार्यक्षेत्रात वर्चस्व वाढेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. कुटुंब सदस्यांच्या आरोग्याच्या तक्रारी डोकं वर काढतील. आपले उष्णतेचे विकार बळावतील.

कर्क चंद्र-शुक्राच्या समसप्तम योगामुळे अनेक विचार अमलात आणाल. काही गोष्टी मनाविरुद्ध घडतील. समस्येचा अधिक विचार करण्यापेक्षा त्याच्या उपयाबद्दल योग्य दिशेने विचार करून कृती देखील कराल. नोकरी-व्यवसायातील निर्णय घाईघाईने घेऊ नका. साकल्याने घेतलेला निर्णय सर्वांच्या हिताचा ठरेल. जोडीदाराचे प्रश्न समजून गैरसमज दूर कराल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. मूत्राशयाचे व मूत्रपिंडाचे आरोग्य सांभाळा.

सिंह चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे  कामातील उत्साह वाढेल. मित्रपरिवारासाठी नव्या योजना आखाल. नोकरी-व्यवसायात उच्चपद भूषवाल. सहकारी वर्गाकडून कामे करून घेताना शिस्तीचे भान राखाल. जोडीदाराला त्याच्या बुद्धिमत्तेची योग्य पोचपावती मिळेल. मुलांची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक वाद चिघळू देऊ नका. संयम राखा. मणका, हाडे, सांधे यांची विशेष काळजी घ्यावी. त्रास वाटल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. दिरंगाई नको.

कन्या गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे उच्चपदावरील लोकांच्या ओळखी कामी येतील. कामाला गती येईल. नोकरी-व्यवसायात मेहनतीला दाद मिळेल. वैचारिक मंथन चांगले कराल. नव्या योजना आखताना त्यातील बरे-वाईट मुद्दे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्याल. सहकारी वर्गाचे साहाय्य मिळेल. जोडीदार आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडेल. कामाच्या ठिकाणी ताण वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नातेवाईकांच्या मदतीला धावावे लागेल. वातविकार सतावतील.

तूळ चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे आपल्या आवडी-निवडी जपाल. छंद जोपासाल. यातून गरजूंना मदत कराल. नोकरी-व्यवसायात महत्त्वपूर्ण उलाढाली होतील. नवे करार करण्याची संधी प्राप्त होईल. सहकारी वर्गाच्या अडचणी समजून घ्याल. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडाल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक वातावरण ओढाताणीचे होईल. पैसा, मेहनत जास्त खर्ची पडेल. हाडे आणि यकृताचे आरोग्य जपणे आवश्यक!

वृश्चिक चंद्र-शुक्राच्या समसप्तम योगामुळे रोजची तीच तीच वाटणारी कामे रंजकपणे कराल. त्यात स्वारस्य निर्माण कराल. इतरांकडून दाद मिळवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. त्यांना त्यांच्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे तुमच्याकडे मिळतील. सहकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात महत्त्वाची कामगिरी पार पडण्याची संधी उपलब्ध होईल. बुद्धिचातुर्याने कुटुंब सदस्यांची मने जिंकाल. आम्लपित्ताचा त्रास होईल.

धनू चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे बुधाच्या बुद्धिमत्तेला चंद्राच्या नावीन्याची जोड मिळेल. नव्या विषयाचे चटकन आकलन होईल. नोकरी-व्यवसायात परीक्षण-निरीक्षणात चोखंदळपणा दाखवाल. सहकारी वर्गाच्या त्रुटी दाखवून द्याल. आस्थापनेच्या दृष्टीने लाभदायक ठरतील असे निर्णय जाहीर कराल. जोडीदाराच्या कामात प्रगतीकारक हालचाली होतील. कुटुंबाचे आर्थिक गणित नव्याने मांडाल. मानेत वा कमरेत लचक भरल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला व औषधोपचार घ्यावेत.

मकर शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे शनीच्या मेहनतीला चंद्राच्या नावीन्याची जोड मिळेल. आपल्या विचारांत थोडा बदल केल्याने अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटतील. नोकरी-व्यवसायात अनुभवातून नव्या गोष्टी शिकण्यास मिळतील. वरिष्ठांचा पाठिंबा, मान्यता मिळवण्यात बरीच शक्ती खर्ची पडेल. सहकारी वर्गावर महत्त्वाची कामगिरी सोपवाल. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मित्रमंडळींच्या मदतीला धावाल. पचनाच्या तक्रारी वाढतील.

कुंभ शुक्र-नेपच्यूनच्या लाभयोगामुळे शुक्राच्या कलात्मक दृष्टीला नेपच्यूनच्या अंत:स्फूर्तीची साथ मिळेल. शास्त्रशुद्ध विचारांना चालना मिळेल. नोकरी-व्यवसायातील कामाची व्याप्ती आणि दर्जा उंचावेल. नवे करार करताना सतर्क राहावे. सहकारी वर्गाला मदत कराल. त्यांच्या समस्या सोडवाल. जोडीदार त्याच्या कामात जास्त व्यस्त होईल. एकमेकांना समजून घेणे आवश्यक! कौटुंबिक जबाबदाऱ्या नेटाने पार पाडाल. कामाच्या तणावामुळे मानसिक थकवा जाणवेल.

मीन चंद्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे अंत:स्फूर्तीच्या बळाने चांगल्या गोष्टींची चाहूल लागेल. आपल्या आवडीच्या कामात मन रमेल. नोकरी-व्यवसायात उपलब्ध साधनांचा पुरेपूर उपयोग करून घ्याल. वरिष्ठांची दाद मिळवाल. सहकारी वर्गाकडून फारशा अपेक्षा न ठेवता पर्यायी योजना तयार ठेवाल. जोडीदार कामाच्या दबावाने थकून जाईल. त्याची चिडचिड वाढेल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवाल. डोळ्यांची काळजी घ्यावी. विश्रांतीची गरज भासेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 7:06 am

Web Title: astrology from 22nd to 28th january 2021 dd70
Next Stories
1 राशिभविष्य : १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०२१
2 राशिभविष्य : ८ जानेवारी ते १४ जानेवारी २०२१
3 राशिभविष्य : १ जानेवारी ते ७ जानेवारी २०२१
Just Now!
X