सरधोपट पाठांतर करण्यापेक्षा मजकूर लक्षात ठेवायच्या क्लृप्त्या लहानपणी सगळ्यांनीच अवलंबलेल्या असतात. तशाच या स्पेलिंग लक्षात ठेवायच्या काही क्लृप्त्या-

शाळेत असताना, इतिहासात एक प्रश्न होता. लॉर्ड डलहौसीने कोणत्या सुधारणा केल्या? तुमच्यापकी कुणाला आठवताहेत का? मला आठवताहेत. कोणत्या इयत्तेत होतो, कोण शिक्षक होते, वगरे काही आठवत नाही, पण डलहौसीच्या सुधारणा आठवताहेत.- ‘पोरं आता शिका’ म्हणजे पोष्ट, रस्ते, आगगाडी, तार खाते, शिक्षण आणि कालवे. ही मला भेटलेली पहिली स्मरणक्ऌप्ती अर्थात mnemonic.
* mnemonic (निमॉनिक) – a word, sentence, poem, etc. that helps you to remember something

आज इंग्रजीतल्या काही स्पेिलग स्मरणक्ऌप्त्यांचा आस्वाद घेऊ.
* cemetery  (सेमट्री)
– an area of land used for burying dead people; graveyard; स्मशान.
सेमट्रीचं स्पेिलग लक्षात ठेवण्यासाठी पुढील वाक्य पाहा.
She cried “eee!” as she passed the cemetery. स्मशानभूमीजवळून जाताना भीतीनं ‘eee’ असं ती चित्कारली. Cemetery मध्ये तीनी e आहेत, हे लक्षात ठेवलं की स्पेिलग चुकायचा प्रश्न नाही.
* rhythm  (रिदम्)
– a regular repeated pattern of sound or movements.
रिदम्चं स्पेिलग लक्षात ठेवण्यासाठी, डोळ्यासमोर चित्र उभं करणारं हे वाक्य पाहा.
Rhythm helps your two hips moving.

* innocent  (इनस्न्ट)- निर्दोष; अननुभवी.
हा निरागस शब्द स्पेिलगच्या बाबतीत घोटाळ्यात टाकणारा आहे. तो लक्षात ठेवण्यासाठी ‘खून हा कोणत्याच शतकात निरागस गुन्हा नाही’ या अर्थाचं वाक्य लक्षात ठेवावं लागेल.
IN  NO  CENTury, murder is an innocent crime.

* slaughter  (स्लॉऽट(र्))
– the cruel killing of large number of people at one time. हा हत्यारा शब्द लक्षात ठेवण्यासाठी (लाफ्ट(र्)) म्हणजे हशा वापरणं, हास्यास्पद वाटेल पण तोच उपाय आहे.
Slaughter is laughter with S at the beginning.
assassination  (असॅसिनेशन्)
– murder of an important or famous person especially for political reasons.
आता या असॅसिनेशनचं स्पेिलग भल्या भल्यांना चकवतं. पण एक आचरट वाटेल अशी क्ऌप्ती ही केस निकालात काढू शकते.
ass + ass +I + nation
गाढव, त्यावर दुसरं गाढव, त्यावर मी आणि त्यावर राष्ट्र (म्हणजे तीन गाढवांवर राष्ट्र)

* mathematics  (मॅथमॅटिक्स)- गणित
मॅथमॅटिक्सचं स्पेिलग गणिताइतकंच त्रासदायक आहे. (शाळेत असताना शिक्षा म्हणून हे स्पेिलग मी पन्नास वेळा लिहून काढलं होतं. पण पुन्हा आठ दिवसात पहिले पाढे पंचावन.) पण या गणिताचंही झकास उत्तर आहे.
He stands between two mats and he is ICS (दोन चटयात तो उभा आहे आणि तो ICS आहे)
mat + he + mat + ics
शेवटी mnemonics हा शब्द लक्षात ठेवण्यासाठी Mnemonics : Now Erase Man’s Oldest Nemesis, Insufficient Cerebral Storage.
ही चांगली क्ऌप्ती आहे, पण यातले सगळे शब्द माहिती नसतील तर ‘रोगापेक्षा औषध भयंकर’ असा प्रकार व्हायचा. मग mnemonics च्या स्पेिलग स्मरणासाठी सोपा उपाय काय? कविमित्राला साकडं घातलं. त्यांनी एक सुरेख ओळ लिहून दिली.
‘मी नसे एकटी, माझ्या ओठी, नाम ईश्वराचे, चांदणे सुखाचे। (mnemonics)’
व्वा, बुवा, व्वा!