News Flash

निमित्त : गणपतीची मूर्ती कशी असावी?

मूर्तीविषयी अथर्वशीर्ष या उपासनाप्रधान उपनिषदात काय सांगितले आहे

ganesh utsav 2021
गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरांत आणि चौकाचौकांत गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.

शिवाजी गावडे – response.lokprabha@expressindia.com
गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरांत आणि चौकाचौकांत गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. भक्त गणेशाला आपापल्या आवडीच्या रूपात घडवून घेतात; पण गणपतीची मूर्ती कशी असावी, किती मोठी असावी, नेमका कोणता मुहूर्त साधावा, याविषयी शास्त्रात पूर्ण माहिती देण्यात आली आहे. मूर्तीविषयी अथर्वशीर्ष या उपासनाप्रधान उपनिषदात काय सांगितले आहे, हे पाहू या..

एकदन्तंचतुर्हस्तं पाशमंकुश धारिणम्।

रदं च वरदं हस्र्त विभ्राणं मूषकं ध्वजम।

रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।

रक्तगंधानुलिप्तांगम् रक्तपुष्प सुपूजितम्॥

अथर्वशीर्षांतील या वचनाप्रमाणे गणेशमूर्ती ही एकदन्ती (एक दात असलेली), चार हातांची, पाश, अंकुश ही दोन आयुधे हाती असलेली (कारण तो संरक्षण करणारा शूरवीर योद्धा आहे.), तुटलेला दात एका हातात आणि दर्शन घेणाऱ्याला प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देणारी (हात वर करून), तसेच दुसऱ्या हातात मोदक (मोदक- ‘मोद’ म्हणजे आनंद आणि ‘क’ म्हणजे ज्ञान देणारा) असलेली असावी. बरोबर मूषकध्वज म्हणजे उंदराची प्रतिमा असलेला ध्वज असावा. लाल वर्णाचा (रक्तम्) लंबोदर, सुपासारखे मोठे कान असलेला, केशरी गंधाचा सर्वागाला लेप असलेला, (लाल कमळासारख्या) रक्तवर्ण फुलांनी पूजलेला अशा श्रीगणेशाचे जे याच रूपात नित्य ध्यान करतात, त्यांना गणपती प्रसन्न होतो असे संकेत आहेत. अशी मंगलमूर्ती लाभप्रद आणि कल्याणकारक  ठरते. हे वर्णन लागू पडेल, अशीच गणेशाची मूर्ती खरेदी करावी. गणेशोत्सवात गडद लाल, केशरी, जांभळ्या, पिवळट रंगाला प्राधान्य द्यावे. रक्तवर्ण, रक्तगंध (रक्तचंदन), रक्तपुष्प या शब्दांतील ‘रक्त’ हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, हे विसरू नये.

एकदंतम् शूर्पकर्णम् गजवक्त्रम् चतुर्भुजम् ।

पाशांकुशधरम् देवम् ध्यायेत सिद्धिविनायकम्॥

ध्यायेत देवम् महाकायम् तप्तकांचन संनिभम्।

चतुर्भुजम् महाकायम् सर्वाभरणभूषितम्॥

दंताक्षमाला परशुपूर्ण मोदक हस्तकम्।

मोदकासक्त शुंडाग्रम् एकदंतम्  विनायकम्।

‘श्रीगणेश चतुर्थी’ व्रत हे पाíथव गणेशपूजनाचे व्रत आहे, असे सर्वच पंचांगांत ठळकपणे छापलेले असते; परंतु पाíथव गणेश म्हणजे नेमके काय? हेच अनेकांना माहीत नसते. पाíथव म्हणजे पृथ्वीपासून (पंचमहाभूतांपकी सर्वाद्य.) नदी, ओढा, सरोवर, तळे यांसारख्या जलाशयाच्या काठावरील पाऊस पडून ओली झालेली माती खणून, कणीक ितबतो तशी मळून तिची स्वत:च्याच हाताने गणेशाची मूर्ती तयार करावी. गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, पूजा करून ती वाळून भंग पावण्यापूर्वी अर्धा दिवस, दीड दिवस किंवा पाच दिवस (गौरीबरोबर) होताच तिचे वाहत्या जलप्रवाहांत अथवा शेतांत विसर्जन करावे. निसर्गातून घेतलेले पुन्हा निसर्गाला परत करावे. ही खरी ‘पाíथव गणेश पूजा!’

आज मात्र हे सर्व संकेत झुगारून शाडू, प्लास्टर ऑफ पॅरिस इतर तत्सम पदार्थापासून आपल्याला हवे तसे गणपतीचे रूप तयार केले जाते. ज्यांना शास्त्रोक्त पद्धतीने गणेशोत्सव साजरा करायचा आहे, त्यांनी माती मळून मूर्ती करणे शक्य आणि व्यवहार्य वाटत नसेल, तर बाजारात मिळणाऱ्या मूर्तीपैकी वरील वर्णनानुसार असलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी. गणपती स्तोत्रातही याविषयीचे वर्णन आढळते.

प्रथमं वक्रतुंड च एकदन्तं द्वितीयकम्।

तृतीयं कृष्णिपगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्॥

लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च।

सप्तमं विघ्न राजेन्द्रं धूम्र्वण तथाष्टमम्॥

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्।

एकादशं गणपित द्वादशं तु गजाननम्॥

 • घरगुती गणपतीची मूर्ती एका फुटापेक्षा जास्त मोठी नसावी
 • एक व्यक्ती सहज उचलून नेऊ शकेल, एवढीच मोठी मूर्ती असावी.
 • सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम.
 • साप, गरुड, मासा किंवा युद्ध करताना अशा आकारांतील गणपती घेऊ नयेत.
 • शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती घेऊ नये, कारण शिव-पार्वतीची पूजा िलगस्वरूपातच केली जाते. अशी मूर्ती शास्त्रात निषिद्ध आहे.
 •  गणेशमूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये.
 • गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही; तोपर्यंत तिच्यात देवत्व येत नाही. त्यामुळे विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी.
 • प्राणप्रतिष्ठा करण्याआधी मूर्ती भंग पावल्यास तिला दहीभाताचा नवेद्य दाखवून त्वरित विसर्जित करावे आणि दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करावी. मनात कोणतेही भय व शंका आणू नये.
 • कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्तीऐवजी, शेजारी किंवा मित्रमंडळींकडून पूजा करून नवेद्य दाखवून घ्यावा. विसर्जनाची घाई करू नये.
 • गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद, मद्य व मांसाहार करू नये.
 • गणपतीला साधा भाजीभाकरीचा नवेद्य रोज दाखवला तरी चालतो. आंबट व तिखट पदार्थ नसावेत. दही+साखर+भात हा सर्वोत्तम नवेद्य.
 • विसर्जन मिरवणूक काढताना टाळ, मृदंग वाजवत व अभंग म्हणत गणेशाला निरोप द्यावा.
 • यंदा राज्य शासनाने गर्दी होऊन करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून घरगुती गणपतीची मूर्ती दोन फूट असावी आणि सार्वजनिक गणेशमूर्ती चार फुटांची असावी, असे बंधन घातले आहे. ते निश्चित पाळायला हवे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2021 6:21 pm

Web Title: ganpati idol information nimitta dd 70
टॅग : Ganesh Festival
Next Stories
1 तंत्रज्ञान : ‘डिजिटल रिमोट’ पालकांच्या हाती
2 राशिभविष्य : दि. ३ ते ९ सप्टेंबर २०२१
3 खच्चीकरण!
Just Now!
X