‘लांबला पाऊस, दाटले मळभ’ कव्हर स्टोरीत लांबलेल्या पावसाच्या छायेत संपूर्ण महाराष्ट्राचा धांडोळा घेतलेला दिसतो आणि प्रकर्षांने जाणवते की, वर्षांनुवर्षे आपल्या राज्यात पावसाचे प्रमाण कमी असूनही ना सरकारने जलसंवर्धनासाठी काही उपाय योजले ना शेतकऱ्यांनी आपणहून त्यासाठी काही प्रयत्न केले. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतीकडे इतके दुर्लक्ष व्हावे यासारखे दु:ख नाही. एकीकडे वैज्ञानिक प्रगती असताना शेतकरी पाण्यासाठी आजही आभाळाकडे नजर लावून आहे हे नवल आहे. आलेल्या पावसाचे थेंब न थेंब पाणी साठविणे, पाणथळ जागा वाचविणे, पाण्याच्या योग्य वापरासाठी ठिबक सिंचन वापरणे यांसारखे उपाय मोठय़ा प्रमाणावर होणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारकडे डोळे लावण्यापेक्षा राजेंद्र सिंहसारख्या व्यक्तींचा आदर्श समोर ठेवून पाणीसंवर्धन केले पाहिजे. गेली अनेक वर्षे पाऊस उशिरा येतोय, पण नंतर तो भरपाईसुद्धा करतो, तेव्हा आलेले सर्व पाणी एकत्र करून ठेवले तर पावसाळा उशिरा सुरू झाला तरी चिंता करायचीही वेळ येणार नाही.
‘वाईट तितुके, इथे पोसले!’ हा मथितार्थ स्वार्थाभोवतीच फिरणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर झगझगीत प्रकाश टाकणारा आहे. सिंचन घोटाळ्यातील चौकशी समितीच्या अहवालात कुठलेच मंत्री अधोरेखित झालेले नाहीत, यात फारसे आश्चर्य नाही. कारण अशा चौकशी समित्या या जनतेला दाखविण्यापुरत्या असतात आणि सरकारी अधिकारी बळीचा बकरा बनण्यासाठी असतात हे आता सर्वाना चांगलेच ठाऊक आहे, त्यामुळे चितळे समितीचा अहवाल तरी त्याला अपवाद कसा असणार. पण निवडणुका जवळ आल्यामुळे आता फक्त तेच मुख्य लक्ष्य असल्याने सध्या तरी सिंचन घोटाळ्यातील आरोपी आराम करू शकतात, पण लोकानुनयी निर्णयांची बरसात करूनही सत्ताबदल झाले तर..?
– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव, मुंबई
बेदरकारपणा हाच मृत्यूचा सापळा
‘रस्ते की मृत्यूचे महामार्ग?’ हा लेख (२० जून) वाचला. गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन गल्लोगल्ली वाढत चाललेला बेदरकारपणा अधोरेखित करते. अन्यथा पहाटेच्या शांत वेळी दिल्लीच्या रुंद रस्ते असलेल्या सुरक्षित भागात असा भयानक अपघात होतोच कसा? रस्तोरस्ती अशा हृदयद्रावक घटना रोज घडत आहेत. पूर्वी शहरात केवळ लाल दिवा तोडून जाणारी वाहने आता रस्त्याच्या उलटय़ा बाजूनेही सुसाट वेगाने जाताना दिसतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तर चक्क दुचाकीस्वार आणि तेही उलट दिशेने जाताना सर्रास दिसतात. शहरात खुशाल पदपथावरही दुचाकी वाहन चालवण्यात येते असेही दिसून येते. एकदा तेथे उभ्या असलेल्या हवालदाराला हे थांबवण्याची विनंती केली असता त्यांनी दिलेले उत्तर अधिक भयावह होते. ते म्हणाले की, आम्ही काही करू शकत नाही, कारण यांना अडवले तर सरळ कुठल्या तरी पक्षाच्या नगरसेवकांना फोन करतात. काळ्याकुट्ट काचा आणि वाहन क्रमांकाच्या पाटीवर रंगवलेले कुठल्या तरी राजकीय पक्षाचे निशाण हा जणू बेदरकारपणे वागण्याचा परवाना झालेला आहे. कायदा हा मोडण्याकरताच असतो, असा समज गल्लीपासून दिल्लीपर्यंत जनतेच्या मनावर ठसत गेला आहे. ही वृत्ती सर्वाना शेवटी कुठे घेऊन जाणार आहे, हा प्रश्न भयावह आहे. कायद्याचे पालन आपणहून करणे ही नागरिकांची जबाबदारी आहेच, पण तसे पालन होत नसेल तर त्यावर कारवाई करण्याकरता कोणी जनहित याचिका दाखल करण्याची आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहात न बसणे ही सरकारचीही जबाबदारीच आहे.
‘अनुशासन पर्व’ हा शब्द आणीबाणीच्या कटू आठवणी जागवतो. पण १९७५ नंतर आपण इतकी ‘प्रगती’ केली आहे की, आता साध्यासुध्या वाहतूक नियमांची जरी कसून अंमलबजावणी केली तरी गल्लीपासून दिल्लीपर्यंत जनतेला आणीबाणीसारखाच जाच वाटू शकेल आणि कायदे मोडण्याच्या ‘मूलभूत हक्काची’ गळचेपी झाल्यासारखे वाटेल. नव्या सरकारने ही कडू गोळी तमाम देशाला आपल्या मधुचंद्राच्या काळातच द्यावी – कारण त्यातच सर्वाचे भले आहे. तीच गोपीनाथ मुंडे यांना खरी श्रद्धांजलीही ठरेल.
– प्रसाद दीक्षित, ठाणे.
चांगल्या वाचकाने समीक्षा करावी
‘झापडबंद समीक्षकांनी मारलेलं नवं साहित्य’ हा पंकज भोसले यांचा लेख आवडला. नव्या जमान्याशी कोणताही संबंध नसलेले मराठीचे प्राध्यापक, त्यांनी केलेली समीक्षा हा खरोखरच वादाचा विषय आहे. एक काळ असा होता की ग्रंथालयं उपलब्ध असणं, वाचायला वेळ मिळणं ही सगळी फक्त यांचीच मिरास होती, पण आता इंटरनेटमुळे परिस्थिती बदलली आहे. वाचन ही बाब खऱ्या विचक्षण वाचकाच्या आवाक्यात आली आहे. त्यामुळे वृत्तपत्रं, साप्ताहिकं, मासिकं यांनीसुद्धा समीक्षेसाठी प्राध्यापकांवर अवलंबून न राहता चांगल्या वाचकावर भिस्त ठेवली पाहिजे असं वाटतं.
गौरी नरवणे, पुणे</strong>
मराठीतील ‘श्र’ आणि ‘शृ’ ची चूक
२५ एप्रिलच्या अंकातील ‘सहज संवाद भाषा’ (प्रभाकर बोकील) आणि ‘मराठी लिपीत सुधारणा : अक्षर आणि ध्वनी’ हे लेख वाचले, आवडले.
‘भाषा विवेक’ या सदरासाठी मलाही लिहावेसे वाटले, त्याला कारणही तसेच आहे. हा विषय-विचार माझ्या मनात बरेच दिवस होता. तो मला या सदरात मांडावासा वाटतो.
संस्कृतपासून अनेक भाषा निर्माण झाल्या. तशीच प्राकृत आणि मग मराठी भाषाही अवतरली. देवनागरी लिपी मराठीने संस्कृतपासून अनुसरली. खरेच या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटतो. देवनागरी लिपी ही अतिशय कोरीव आणि प्रत्येक अक्षराला घाटदार वळण असलेली लिपी आहे. यातील प्रत्येक अक्षराला एक विशिष्ट वळण आहे. मात्र इतर लिपींमध्ये हे दिसून येत नाही. या इतर भाषांच्या लिपींमधील अक्षरे ही एखाद्या प्रतीकात्मक चिन्हांसारखी किंवा काही ठिकाणी समजायला अवघड फर्राटय़ांसारखी वाटतात. त्यामुळे संस्कृतकडून मराठी आणि हिंदीने अनुसरलेली ही देवनागरी लिपी अतिशय सुवाच्य आणि ग्रा वाटते.
आता पुढील मुद्दा मला खरोखरच ‘मराठी लिपीत सुधारणा : अक्षर आणि ध्वनी’ या संदर्भात लिहायचा आहे.
आपण वर्षांनुवर्षे जी चूक करीत आलो, त्यात सुधारणा ही व्हायलाच पाहिजे असे मला वाटते. उदा. आपल्या मराठी अक्षरांच्या यादीत ‘श्र’ या अक्षराला स्वतंत्र स्थान आहे. ते अनन्यसाधारण आहे हे निश्चित. हे अक्षर म्हणजे श् आणिर् या अक्षरांचे मिश्रण आहे, पण त्याचे विशिष्ट उच्चारण असल्याने ते ‘श्र’ असे झाले. तसेच ‘क्ष’ या अक्षराचे. ते क् आणि श् यांचे मिश्रण आहे हे त्याच्या उच्चारणातून जाणवते. काही विशिष्ट शब्दांत त्याचे महत्त्व कळते. उदा. क्षितिज, क्षमा, क्षय, क्षार इ. तसेच ज्ञ या अक्षराचे. द आणि न यांच्या मिश्रणातून ‘ज्ञ’ झाले. ज्ञान, ज्ञात अशा शब्दांत त्याची जागा चपखल वाटते. त्याचे स्वतंत्र अस्तित्व पटते. आता ‘त्र’. हे ‘त्र’ अक्षरपण त् आणिर् च्या मिश्रणातूनच झाले. त्रास, त्रस्त, त्रमासिक इ.सारख्या शब्दांत ते आवश्यकच आहे.
‘श्र’ हे अक्षर तर ‘श्री गणेशा’साठीच आहे, इतके त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण मी वर म्हटल्याप्रमाणे आपण वर्षांनुवर्षे ‘श्र’ हे अक्षर घेऊन जी चूक करीत आलो आहोत, ती मला पूर्ण विचारान्ती दुरुस्त कराविशी वाटते. आपल्या समृद्ध मराठी वाङ्मयात ही चूक दुरुस्त करावी अशी माझी मनापासून आणि प्रामाणिक इच्छा आहे.
आपण (अर्थात बरेच ठिकाणी मी हे वाचले आहे, अगदी पूर्वापार चालत आलेल्या वाङ्मयातही) ईष्टद्धr(२२४)वर असा शब्द लिहितो वा लिहिला जातो. पण तो वास्तविक ईश्वर असा लिहिला पाहिजे. तुम्हालाही पूर्ण विचारान्ती हे पटेल. कारण ईश्वर या शब्दातील श्व या जोडाक्षरात र्चा उच्चार हा कुठे तरी पुसटसा तरी आढळतो का? मग हे जोडाक्षर श्र घेऊन का करावे? श्व हाच खरा उच्चार असताना?
तसेच शृंगार या शब्दाचे पाहा. पुष्कळ ठिकाणी हा शब्द श्रृंगार असा लिहिला जातो. आता ‘श’ला ‘र’चे दर्शक ृ हे चिन्ह जोडणे योग्य आहे, म्हणूनच त्याचा उच्चार ‘शृंगार’ असा योग्य होतो, पण ‘श्र’ हा मुळातच श् आणिर् मिश्रित असल्यावर तुम्ही पुन्हा त्याला ‘र’चे दर्शक ृ हे चिन्ह कसे जोडू शकता? त्यांचा उच्चार ‘शृंगार’ असा होण्याऐवजी डबल र मिश्रित होईल. अर्थात तसा तो करताच येणार नाही. तेव्हा तुम्हाला तिथे ‘श्र’च वापरायचे असेल तर ‘श्र’ ला उकार देऊन म्हणजे ‘श्रुंगार’ असा शब्द लिहावा लागेल. तेव्हा त्याचा उच्चार शृंगार असा होईल. पण ते विशेष प्रचलित नाही. हेच प्रश्न, विश्व, विघ्नेश्वर, ज्ञानेश्वर, श्वास अशा अनेक शब्दांच्या बाबतीत म्हणावे लागेल. परवा एका कादंबरीत त्रुटी हा शब्द त्रृटी असा लिहिलेला पाहिला. एक तर तो तृटी असा लिहा किंवा ‘त्र’ला उकार देऊन त्रुटी असा लिहा.
निश्चय काय निश्चित काय उच्चार करून पाहा. तिथं श्र नसून श् आणि च् आहे. मग या चुका का?
ईश्वर, निश्चय, श्वास हे शब्द तर ग्रा मानून लिहिले जातात. ही आपल्या मराठी वाङ्मयातील एक त्रुटी म्हणू नये काय? यापूर्वी यावर मराठी वाङ्मयात विचारच झाला नाही काय? उच्चाराबरहुकूम हे सत्य नव्हे काय?
नलिनी दर्शने