पैसे वाचवायची आयडियाची कल्पना

शेअर बाजाराला तेजी येताच कोणता शेअर घेऊ व कोणत्या म्युच्युअल फंडात पसे गुंतवू, अशी विचारणा करणारे अनेकजण भेटतात.

चंगळवादी होऊन वस्तू आणि सेवांचा पुरेपूर उपभोग घेत असतानाच आपण योग्य प्रकारे अल्पकालीन तसेच दीर्घ मुदतीची आर्थिक गुंतवणूकही करायला हवी. निवृत्तीनंतरही मौजमजा lok06करता येण्यासाठी त्याची तजवीज अशा तऱ्हेने आधीच करणे योग्य!
शेअर बाजाराला तेजी येताच कोणता शेअर घेऊ व कोणत्या म्युच्युअल फंडात पसे गुंतवू, अशी विचारणा करणारे अनेकजण भेटतात. यात दोन वर्ग दिसून येतात. पहिला वर्ग म्हणजे सुस्थापित मंडळी. जे सांगतात, ‘तुम्ही फक्त स्कीमची नावे सांगा, आम्ही लाखांमध्ये गुंतवतो.’ यांच्याकडे पशाला तोटा नसतो. दुसरा वर्ग म्हणजे गुंतवणूक करायची तर आहे, पण पसे नाहीत म्हणणाऱ्यांचा. ही मंडळीदेखील छान-छान राहतात, दर वीकएंडला मॉलला जातात, बुडाखाली दोन किंवा चार चाकी गाडय़ा फिरवतात. पण यांचे एकच म्हणणे असते- ‘अहो एक तारखेला हातात आलेला पगार महिनाअखेपर्यंत पुरत नाही, गुंतवणूक करायला कुठून पसे आणणार?’
 ‘उद्यापासून सगळी चंगळ बंद करा,’ असे सांगायची सोय नाही इतकी मौजमजेची जीवनसरणी त्यांच्या अंगवळणी पडलेली असते. काटकसर वगरे जुनी मूल्ये पुन्हा जवळ करायला फार वेळ लागतो. त्याची सवय व्हायला व त्याचे आíथक सुपरिणाम दिसायलाही वेळ लागतो. अशा वेळी सुरुवात कुठून करायची हे कळतच नाही. आज असेच काही झटकन लागू पडणारे उपाय बघू या.
 क्रेडिट कार्ड हे नवीन पिढीसाठी ‘मिस्टर डिपेंडेबल’ असले तरी जुन्या पिढीसाठी ते सतान म्हणूनच गणले जाते. मात्र, प्रत्यक्षात क्रेडिट कार्ड या दोन्ही टोकांकडे येत नाही. क्रेडिट कार्डाचा योग्य वापर ‘बचत’ करून देऊ शकतो. कॅश बॅक क्रेडिट कार्डाचा वापर केल्यास वीज बिल, फोन बिल, इंधन (पेट्रोल-डिझेल) खरेदी यावर कॅश बॅक मिळते. एक हजार रुपये वीज बिल असे कार्ड वापरून ऑनलाइन भरले तर वीज कंपनी एक टक्का सवलत देते. क्रेडिट कार्ड पाच टक्के सूट देते म्हणजे एक हजार रुपयांच्या बिलावर प्रत्यक्ष सहा टक्के सूट मिळते. दर महिन्याला अशी सहा टक्के सूट मिळणे शक्य आहे. नऊ टक्के व्याज देणाऱ्या बँकेच्या मुदत ठेवीवर ३०.९ टक्के कर भरून वर्षअखेरीला सहा टक्केच हाती येतात, हे लक्षात घेतले तर ही कॅश बॅक किती महत्त्वाची आहे हे लक्षात येईल.
क्रेडिट कार्ड कंपनी फक्त विवक्षित रकमेपेक्षा अधिक बिल भरल्यासच कॅश बॅक देऊ करतात. उदाहरणार्थ पाच टक्के कॅश बॅक फक्त एक हजार रुपये व अधिकच्या फोन बिलावर मिळेल अशी अट असू शकते. तुमचे फोन बिल जरी ६०० रुपये आले तरी एक हजार रुपये भरा. त्यामुळे कॅश बॅकसाठी पात्र ठरून प्रत्यक्षात ९५० रुपयेच भरले जातील आणि ४०० रुपये पुढील बिलात वळते होतील. बहुतांश फोन कंपन्या चांगल्या स्थितीत असल्याने एक महिन्याचे क्रेडिट त्यांना द्यायला हरकत नाही. अर्थात क्रेडिट कार्डाचा वापर जपून करावा. कोणत्याही परिस्थितीत क्रेडिट कार्डाची बिले वेळेवर चुकती करावीत. अशा प्रकारे क्रेडिट कार्ड वापरून खर्च कमी करणे शक्य आहे.
नवतरुण नोकरदारांची आणखी एक दुखरी नस म्हणजे होम लोन. व्याजाचे दर खाली येणार अशी हाकाटी गेले वर्षभर चालू आहे. मुदत ठेवींवरचे व्याज दर खाली आले आहेत. पण गृह कर्जावरील व्याज दर ११ ते ११.५० टक्के पर्यंत दिसून येतात. नवीन गृह कर्जे मात्र १०.२५ टक्क्य़ांच्या जवळपास उपलब्ध आहेत. अशा वेळी गृहकर्ज नवीन बँकेकडे हस्तांतरित करणे शहाणपणाचे ठरेल. बरीच मंडळी ‘नको त्या फेऱ्या’ असे म्हणून गृह कर्ज चढय़ा व्याजदराने भरत राहतात. पण खरे तर हल्ली गृह कर्ज घेणे सोपे झाले आहेच, शिवाय तुमच्या सध्याच्या बँकेला एकदा गृह कर्ज दुसऱ्या बँकेकडे नेतो असे सांगितल्यावर सध्याचीच बँक झटकन व्याजदर खाली आणते की नाही ते पाहा. व्याज दर कमी झाल्यावर कर्जाची मुदत किंवा व्याजाचा हप्ता कमी करण्याचे पर्याय आहेत. व्याजाच्या हप्त्याची रक्कम कमी केल्यास हातात काही पसे निश्चितच वाचतील.
गृह कर्जासोबतच काहींच्या नावावर क्रेडिट कार्डाचे ईएमआय व पर्सनल लोनदेखील असतात. यावर व्याजाचा दर जास्त (१६ ते २२ टक्के) असतो. गृहकर्जाबरोबर ‘टॉप अप लोन’ घेऊन अशा महागडय़ा कर्जापासून सुटका करून घ्यावी. ‘टॉप अप लोन’चा व्याजदर पर्सनल लोनच्या तुलनेत बराच कमी (१२ ते १४ टक्के) असतो. त्यामुळे ‘टॉप अप लोन’चा हप्तादेखील कमी असतो. यातून बऱ्यापकी बचत होऊ शकते.
आता नोव्हेंबर महिना चालू आहे. दिवाळी नुकतीच येऊन गेली. अनावश्यक खरेदी झाली असेल किंवा निरुपयोगी वस्तू भेटवस्तू म्हणून गळ्यात पडल्या असतील तर ऑनलाइन विकताना जराही कचरू नका. चंगळवादाची ही दुसरी बाजू गराज सेल म्हणून प्रसिद्ध आहे. ती नाकारून चालणार नाही. टीव्हीवर अशा विक्रीची सुविधा देणाऱ्या वेबसाइटच्या अनेक जाहिराती येतात. तशाच एखाद्या संकेतस्थळावर किंवा मित्र-मत्रिणींमध्ये अशा वस्तू जरूर विका. तेवढाच ‘कॅश फ्लो’ सुधारतो.
पुढील महिन्यात नोकरदार मंडळींना त्यांच्या कंपन्यांकडून करपात्र गुंतवणुकींचे पुरावे देण्यास सांगण्यात येईल. हातात काही रोख रक्कम असेल तर आताच करपात्र गुंतवणुकांमध्ये गुंतवा म्हणजे त्याचे पुरावे वेळेवर दाखवता येतील. बरीच मंडळी हे गुंतवणूक पुरावे वेळेवर देत नाहीत. त्यामुळे जानेवारी ते मार्चमध्ये पगारातून करवसुली होऊन हातात येणारा पगार रोडावतो. दर वर्षी हे घडूनसुद्धा फार थोडी मंडळी त्यापासून बोध घेतात, ही वस्तुस्थिती आहे.
कितीही तंगी असली तरी ‘फेस्टीव्ह सीझन’मध्ये एक तरी ‘शॉर्ट वेकेशन किंवा आऊटिंग’ हवीच असा तरुणांचा आग्रह असतो. कर्ज वगरे न काढता शक्य असेल तर अशी ट्रिप जरूर करावी, पण तेथेही एक छोटा बदल केल्यास बचत होऊ शकते. आठवडय़ाअखेरीस कुठे तरी जाण्यापेक्षा आठवडय़ाच्या मधल्या दिवशी आवर्जून फिरायला जा. आठवडय़ाअखेरच्या तुलनेत आठवडय़ाच्या मधल्या दिवसांत खर्च २० ते २५ टक्के कमी येतो. पसे थोडे कमी खर्च होतात तसेच गर्दीही कमी मिळते. ज्यांची मुले शाळेत जायच्या वयाची नसतील त्यांनी हा पर्याय जरूर चोखाळावा.
हे झाले पसे थोडे कमी खर्च करून बचत वाढवायचे काही अल्पकालीन मार्ग. दीर्घ मुदतीत आíथक शिस्त बाणवून गुंतवणूक करणे आपल्या हिताचे असते, हे नव्याने सांगायला नको. चंगळवादी होऊन वस्तू व सेवांचा पुरेपूर उपभोग घेताना योग्य गुंतवणूक करून निवृत्तीनंतरही मौजमजा करता येईल याची तजवीजही आपल्यालाच करायला हवी.     

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Idea to save money

Next Story
श्रीमंत कुणाला म्हणावे?