scorecardresearch

Premium

पडसाद: ‘हिंदूत्व व जातिप्रथा’ या मारकच

‘लोकरंग’ (२१ मे) मधील गिरीश कुबेर यांच्या ‘हायकमांडीकरण आणि कलते कमंडल!’ या लेखावरील निवडक प्रतिक्रिया..

mail
(संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता टीम

‘लोकरंग’ (२१ मे) मधील गिरीश कुबेर यांच्या ‘हायकमांडीकरण आणि कलते कमंडल!’ या लेखावरील निवडक प्रतिक्रिया..

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

या लेखात गिरीश कुबेर यांनी विविध गोष्टींचा धावता आढावा घेतला आहे. ‘जातिप्रथा’ हे सकल हिंदू प्रजाजनांचे जवळपास ‘अपरिवर्तनीय’ व निरंतर भळभळणारे दु:ख होय. त्रयस्थपणे बघितले तर ‘हिंदूत्व व जातिप्रथा’ या परस्परपूरक नसून, परस्पर मारकच ठरतात.

अजूनही शिक्षित समाजातसुद्धा लग्न जमविताना प्रथम स्व-जातीचे स्थळ बघितले जाते. यात आंतरजातीय प्रेमविवाहास घरच्यांची संमती असणे हे जमेस धरता येत नाही. कारण ती एक प्रकारची मोठय़ा मनाने किंवा नाईलाजाने केलेली तडजोड असते. स्वखुशीने किती आंतरजातीय विवाह घडतात? यात नजीकच्या भविष्यकाळात बदल घडेल असे दिसत नाही. जोपर्यंत स्वखुशीने, उमदेपणाने विविध जातींमध्ये ‘मुक्त’ रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत, तोपर्यंत ‘हिंदू उत्थानाचा’ मार्ग खडतरच असेल. समान नागरी कायदा लागू केला तरी जात-पंचायत, खाप पंचायत, ग्रामसभा अशा  सर्व समांतर संस्थांचे, अथवा न्याय-केंद्रांचे निर्णय रद्दबातल होतील काय? या जातिप्रथेचा परिणाम सर्वच व्यवहारात दृष्टोत्पत्तीस येतो, ज्यात राजकारण प्रामुख्याने येते.

आल्हाद (चंदू) धनेश्वर

बेरोजगारी, महागाई यावर भाजपने बोलणे गरजेचे

कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दारुण पराभवातील अनेक कारणांपैकी एक प्रमुख कारण म्हणजे, आजच्या तरुण मतदारांना कॉंग्रेस पक्ष किती ‘नालायक’ आहे, यापेक्षा भाजप पक्ष कसा ‘लायक’ आहे हे पटवून देण्यात आलेले ढळढळीत अपयश हेच होय! आताचा मोठय़ा प्रमाणातील नवतरुण मतदार तुलनेने नक्कीच ( सु ) शिक्षित असल्याने जात-धर्म यास तो सहजासहजी भुलत

नाहीत. मूलभूत गरजा – नोकरी – सर्वागीण विकास  याच त्यांच्या अपेक्षा होत. भाजपचे ‘हिंदूत्व’ , ‘गोमांस’ ही लोकप्रिय चलनी नाणी भविष्यात कालबाह्य होण्याच्या मार्गावर असल्याने, त्या पक्षाने आता बेरोजगारी हटवण्याबरोबरच महागाई कमी करणे यावर विचार करणे हीच अत्यावश्यक बाब बनली आहे. याद्वारेच भाजपचे भवितव्य पुन्हा उज्ज्वल होऊ शकेल, हे नक्कीच! अन्यथा..

बेंजामिन केदारकर, विरार.

हिंदू मतदारांनीही भाजपला नाकारले

 या लेखात ‘भाजपमधील हायकमांड संस्कृती’ या विषयावर मनोरंजकपणे प्रकाश टाकला आहे. ‘राममंदिर’ उभारणीनंतरही अनेक हिंदू मतदारांनी भाजपला नाकारले आहे, हाही एक प्रमुख घटक आहे.

गिरीश गीते

.. तर ते कलणार कसे?

हा लेख म्हणजे कर्नाटकातील निवडणुकीच्या निकालाचे अतिशय वास्तववादी विश्लेषण. भाजपचे कमंडल देशातील जनतेने स्वीकारले नाही आणि घटनेने घालून दिलेली धर्मनिरपेक्षतेची घडी किती मजबूत आहे हेच या निकालावरून सिद्ध होते. परंतु भाजपसारखे धर्मवादी पक्ष आणि लोक धर्मनिरपेक्षतावादाला तडा देण्याचे काम जोमाने करत आहेत आणि त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करीत आहेत. धडधडीत खोटे बोलणे आणि सत्य लपवणे हा जणू भाजपचा स्थायीभाव आहे असे वाटत आहे. आजघडीला जे काही भाजपचे सरकार आहे ते स्थापण्यासाठी धर्माची नव्हे तर दडपशाही, अरेरावी आणि झुंडशाही या शक्तींची साथ आहे हे सर्वश्रुत आहे. खरे तर भाजपने सरकारी यंत्रणांचा आणि प्रसारमाध्यमांचा विरोधकांविरुद्धचा अनिर्बंध वापर जर थांबवला तर भाजपला जनतेची किती साथ आहे हे लक्षात येईल. विरोधकांना अतिशय हिनपणाने वागवणे, संबोधणे आणि जेरीस आणणे हे जर भाजपने थांबवले तर भाजपविरुद्ध पर्यायी नेतृत्व निर्माण होईल आणि भाजपला त्यांची खरी जागा कळेल. यावरून एकच गोष्ट लक्षात येते की, भाजपला हिंदूत्ववाद्यांची साथ नसून त्यांनी अवलंबलेल्या तोडा, फोडा आणि झोडा या नीतीचा परिणाम म्हणून त्यांचे अस्तित्व दिसत आहे. भाजप समजते इतका भारतीय समाज नक्कीच मूर्ख नाही. भाजप सत्तेत आल्यापासून देशाची सर्व स्तरावर पीछेहाट झाली आहे. विकासाच्या नावाने केवळ रस्ते बांधणे, पूल बांधणे, नालेसफाई करणे अशी कामे काढून आपल्या कार्यकर्त्यांना कमाई करण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला जात आहे. परंतु सरकारी यंत्रणा आणि प्रसारमाध्यम यांचा वापर करून देशाची खरी परिस्थिती जनतेसमोर येऊ दिली जात नाही. एवढं करूनसुद्धा कर्नाटकच्या जनतेने भाजपला जो धडा शिकवला तो वाखाणण्याजोगा आहे.

– अरुण नामदेव कांबळे, नेरुळ

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-06-2023 at 01:01 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×