लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक नामवंतांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, सुरेश कलमाडींना डावलून पुण्यातून काँग्रेसची उमेदवारी मिळवलेले विश्वजित कदम, दिलीप गांधी आदींचा समावेश होता. या सर्व उमेदवारांनी त्यांच्या मालमत्तेचा तपशील सादर केला. आम आदमी पक्ष आपण सामान्य लोकांचा पक्ष असल्याचा दावा करीत असला तरी लोकसभेची निवडणूक लढणारे या पक्षाचे मुंबईतील जवळजवळ सर्वच उमेदवार किमान कोटय़धीश असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रांवरून दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सतीश जैन
(आप, उत्तर मुंबई)
*जंगम मालमत्ता १० कोटी ७४ लाख
*कर्ज- ६ कोटी ५० लाख रुपये
*वाहने – होंडा सिटी व टोयोटा इनोव्हा गाडय़ा
*दागिने- २६ लाख रुपये
*महालक्ष्मी येथे १ कोटी १० लाखांचा फ्लॅट .

फिरोझ पालखीवाला
(आप, उत्तरमध्य मुंबई)
*पत्नीच्या नावाने १ कोटी ५७ लाखांची मालमत्ता
*३.२५ लाखांच्या बँक ठेवी, २ लाख ७१ हजारांचे दागिने
*स्थावर मालमत्ता ८० लाख
*मुंबईत २४ कोटी रुपये किमतीचा फ्लॅट
*कर्ज नाही

सुंदर बालकृष्णन
(आप, दक्षिण मध्य मुंबई)
*जंगम मालमत्ता ५८ लाख ८७ हजार रुपये. स्थावर मालमत्ता १. ६५ कोटी
*चेंबूर येथे दोन फ्लॅट्स- किंमत १ कोटी ६५ लाख
*बँकेत ठेवी ५२, ४७०००
*४४ लाखांच्या बँक ठेवी, १३ लाखांचे दागिने
*कर्ज नाही

विश्वजित कदम
(काँग्रेस, पुणे)
*८७ कोटी ४९ लाख रुपयांची मालमत्ता
*४६ कोटी ३० लाख रुपयांची जंगम मालमत्ता
*४१ कोटी रुपये किमतीच्या जमिनी
*घर आणि गाडी नाही

श्रीरंग बारणे
(शिवसेना, मावळ)
*एकूण संपत्ती ५२ कोटी रुपये
*३८ लाख रुपये रोख
*पाच कोटींची जंगम मालमत्ता
*४६ कोटींची स्थावर मालमत्ता
*९८ लाखांचे कर्ज

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस, बारामती)
*३१ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता
*रोख रक्कम अवघी २५ हजार रुपये
*शेअर्समधील गुंतवणूक सात कोटी रुपये
*१३ कोटी रुपये किमतीच्या सदनिका
*सिंगापूर येथील बँकेत एक कोटींची गुंतवणूक

अमरिश पटेल (काँग्रेस, धुळे)
*एकूण संपत्ती १५ कोटी रुपये
*रोख रक्कम एक लाख ६० हजार
*३२ लाखांच्या मुदत ठेवी
*शेअर्स एक कोटी ८४ लाख

भाऊसाहेब वाकचौरे (काँग्रेस, शिर्डी)
एकूण संपत्ती सहा कोटी ५८ लाख रुपये
*दिलीप गांधी (भाजप, नगर)
एकूण संपत्ती सहा कोटी ५७ लाख रुपये
*राजीव राजळे (राष्ट्रवादी, नगर)
एकूण संपत्ती सहा कोटी ६ कोटी २६ लाख
*सदाशिव लोखंडे (शिवसेना, शिर्डी)
एकूण संपत्ती तीन कोटी ७९ लाख रुपये
*माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील – ३२ कोटी
*दिपाली सय्यद तीन कोटी ५३ लाख रुपये

लक्ष्मण जगताप (शेकाप, मावळ)
*एकूण मालमत्ता चार कोटी ६६ लाख रुपये
*एक कोटींची जंगम मालमत्ता

डॉ. सुभाष भामरे (भाजप, धुळे)
*मालमत्ता ४.६९ कोटी रुपये
*रोख रक्कम दोन लाख ५४ हजार
*१२ लाखांच्या मुदत ठेवी
*पावणेदोन कोटी रुपयांची जमीन

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All actor parties in mumbai vishwajeet kadam in pune
First published on: 06-04-2014 at 08:25 IST