लोकसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान होणार आहे. गोवा, आसाम, त्रिपुरा आणि सिक्किम या राज्यांमधील सात मतदारसंघामध्ये ही निवडणूक होत आहे. या राज्यांमधील तब्बल ७४ उमेदवार निवडणूक िरगणात आहेत. गोव्यामधील दोन मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. उत्तर गोव्यामधून भाजपने विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांनाच उमेदवारी दिलेली आहे, तर काँग्रेसने रवी नाईक आणि आम आदमी पक्षाने दत्ताराम देसाई यांना उमेदवारी दिलेली आहे. दक्षिण गोव्यातून भाजपचे नरेंद्र सवाईकर, काँग्रेसचे अॅलेक्सिओ रेजिनाल्डो आणि आपच्या स्वाती केरकर एकमेकांविरोधात लढत देणार आहे. आसाममध्ये ७ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले होते. शनिवारी दुसऱ्या टप्प्यासाठी तीन मतदारसंघात मतदान होईल.
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2014 रोजी प्रकाशित
चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान
लोकसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान होणार आहे. गोवा, आसाम, त्रिपुरा आणि सिक्किम या राज्यांमधील सात मतदारसंघामध्ये ही निवडणूक होत आहे.
First published on: 12-04-2014 at 05:06 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha elections assam goa sikkim and tripura enter in fourth phase election today