गेल्या एक महिन्यापासून टोमॅटोची गणना लाल सोन्यामध्ये होऊ लागली. मुंबईच्या बाजारपेठेत टोमॅटोचे दर १०० रुपये किलोवर गेले. गेल्या एक वर्षांपासून टोमॅटोच्या दरात अस्थर्य आहे. या अस्थर्याला यापूर्वी नसíगक वातावरण कारणीभूत असे. पण एक वर्षांपासून नियमनमुक्ती, सर्जकिल स्ट्राइक, निश्चलनीकरण ही धोरणेदेखील तेवढीच कारणीभूत ठरली आहे.

बाल भारतीच्या पुस्तकातील एका धडय़ाचे नाव लाल चिखल असे होते. टोमॅटोला भाव मिळत नाही, म्हणून असह्य झालेला एक गरीब शेतकरी रस्त्यावर टोमॅटो फेकून देन त्यावर नाचतो. त्यातून लाल चिखल तयार होतो. अशीच एक कथा साहित्यिक भास्कर चंदनशीव यांचीही असून त्यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठही लाल चिखलाचेच आहे. पण गेल्या एक महिन्यापासून टोमॅटोची गणना लाल सोन्यामध्ये होऊ लागली. मुंबईच्या बाजारपेठेत टोमॅटोचे दर १०० रुपये किलोवर गेले. गेल्या एक वर्षांपासून टोमॅटोच्या दरात अस्थर्य आहे. या अस्थर्याला यापूर्वी नसíगक वातावरण कारणीभूत असे. पण एक वर्षांपासून सर्जकिल स्ट्राइक, नियमनमुक्ती, निश्चलनीकरण ही धोरणेदेखील तेवढीच कारणीभूत ठरली आहे. एक महिनाभर असलेली तेजी आता कमी व्हायला लागली. तेजी व मंदीचा खेळ जसा पावसावर अवलंबून आहे. तसाच तो सरकारी धोरणावरदेखील आहे.

टोमॅटोची शेती ही मुळात अतिकष्टाची. ती करण्याकरिता पारंपरिक ज्ञान, अभ्यास व अनुभव हवा असतो. मुळात टोमॅटोचे वेल हे मऊ व लुसलुशीत असते. त्याला आधार द्यावा लागतो. त्यामुळे त्याच्यावर रोग येतो. विशेषत विषाणुजन्य बोकडय़ा या रोगाला तो लवकर बळी पडतो. अनेकदा पूर्ण पीक नष्ट होते. या रोगात वाढ खुंटते. बुरशीजन्य, विषाणुजन्य व जिवाणुजन्य असे सारेच रोग त्यावर पडतात. ३४ अशांपेक्षा जास्त तापमान किंवा कमी तापमान टोमॅटोला मानवत नाही. पाहिल्या दिवसापासून खूप कष्ट करावे लागतात. मजुर मोठय़ा प्रमाणात लागतात. कृषी विद्यापीठांनी अनेक जाती शोधल्या. पण बियाणांची निर्मिती केली नाही. कुशल मजूर व पसा लागत असल्याने एकही कृषी विद्यापीठ बियाणे तयार करून विकत नाही. आता महाबीजने तो प्रयत्न चालविला आहे. बहुराष्ट्रीय बियाणे कंपन्याच बियाणे तयार करतात. शेतकरी हे नर्सरीतून तयार रोपे विकत घेतात. त्यावर ५ ते १० हजारांचा खर्च करावा लागतो. मशागत, शेणखत, मिल्चग, ठिबक, मांडवाकरिता तारा, बांबू व सुतळी, खते, औषधे, तणनियंत्रण यावर प्रचंड खर्च करावा लागतो. एकरी सुमारे १ लाखांहून अधिक खर्च येतो. सरासरी २० ते २५ रुपये किलो भाव मिळाला तरच शेतकऱ्यांना परवडते. रब्बीची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर, खरीपाची लागवड मे ते जुनमध्ये केली जाते. पण लागवडीचा हंगाम नसतांना म्हणजे एप्रिल ते मे दरम्यान लागवड केली तरच जादा भाव मिळतो. जून ते सप्टेंबर दरम्यान टोमॅटोचे दर हे वधारलेले असतात. मुळात हंगाम नसताना जेथे गारवा आहे, आजुबाजूला धरणे आहे तेथेच लागवड यशस्वी होते. विशेषत पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जुन्नर, आळेफाटा, नगर जिल्ह्यात अकोले, संगमनेर येथे ही लागवड केली जाते. ३४ अंशाच्या आत तेथे या काळात तापमान असल्याने शेतकरी त्याचा फायदा घेतात. आता पॉलिहाऊस, शेडनेटमध्येही लागवड केली जाते. प्रतिहेक्टरी ५० ते ६० टन सरासरी उत्पादन आहे. पण अनेक शेतकरी आपल्या प्रयोगशीलतेच्या जोरावर एकरी ३० ते ४० टन टोमॅटो सहज काढतात. टोमॅटो हा अंबट-गोड असावा लागतो. आम्लता व साखरेमुळे ही चव येते. बाजारात लाल रंगाचा, उभट गोलाकार, जाड साल असल्यास मागणी असते. गेल्या काही वर्षांत सरासरी १० ते १२ रुपये दर मिळत होता. तरीदेखील शेतकऱ्यांना ते परवडत होते. त्याखाली भाव आले तर मात्र आतबटय़ाचा व्यवहार ठरतो. एक वर्षांपूर्वीपर्यंत सलग दोन-तीन वर्षे शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला. अनेक शेतकरी त्यामाध्यमातून लखपती झाले. त्यांच्यासाठी ते लाल सोने ठरले. पण मागील एक वर्षभर लाल चिखलाच्या कथेतील असाह्य शेतकऱ्याप्रमाणे त्यांची अवस्था झाली.

राज्यातील सर्वात मोठी टोमॅटोची बाजारपेठ िपपळगाव बसवंत (जि. नाशिक) येथे आहे. या बाजारपेठेचा अभ्यास केला असता गेल्या वर्षभरात किती संकटांना सामोरे जावे लागले. त्याचा परिणाम कसा कमी उत्पादनावर झाला हे स्पष्ट होते. आज जे दर वाढले आहे त्याला निसर्ग कारणीभूत नाही. तर सरकारी धोरण कारणीभूत आहे हे स्पष्ट होते. आता सध्या दोन ते अडीच हजार कॅरेट विक्रिला येतात. आवक भरपूर असते तेव्हा दोन लाख कॅरेटची विक्री होते. सुमारे दीडशे आडते नोंदणीकृत असले तरी त्यापकी १२० आडते काम करतात. संपूर्ण देशातून चारशे ते पाचशे व्यापारी येथे खरेदीसाठी येतात. बांग्लादेश, पाकिस्तान, दुबईला येथून टोमॅटोची निर्यात होती. देशभर तो येथूनच जातो असे बाजार समितीचे टोमॅटो प्रमुख सुधाकर गिते यांनी सांगितले. त्यांचे म्हणणे खरे असले तरी आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेलीच नाही. बाजार पेठेतील एक प्रमुख आडते अरुण चव्हाणके यांनी नियमनमुक्ती व निश्चलनीकरणामुळे कशी वाट लागली याचे अनुभव सांगितले. िपपळगाव बसवंतला नाशिक, नगर, औरंगाबाद, धुळे, सोलापूर, पुणे, जळगाव आदी जिल्ह्यातून शेतकरी माल घेऊन येतात. पण मागील वर्षी नियमनमुक्ती झाल्यानंतर आडत्यांनी बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आडत घ्यायला सुरुवात केली. त्यांना ही पद्धत अडचणीची वाटली. त्यातच निश्चलनीकरणामुळे व्यापाऱ्याकडे पसाच राहिला नाही. बाजारपेठेत उठाव नव्हता. एकवर्षभर दोन रुपये ते पाच रुपये किलोने टोमॅटोची विक्री झाली. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले. त्यामुळे लागवड झाली नाही. साहजिकच बाजारपेठेत मालाचा तुटवडा तयार झाला. भाव वाढले. ४० ते ५० रुपये किलो शेतकऱ्यांना दर मिळाला तरी मुंबईच्या ग्राहकांना मात्र तो १०० रुपयांनी घ्यावा लागतो. कर्जबाजारी शेतकऱ्यांना हा एक दिलासा होता. पण मागणी नसल्याने दर फारच कमी काळ स्थिर राहिले. आता ते कमी होऊ लागले आहे. शेतकऱ्यांना २० ते २५ रुपये किलो दर मिळाले तरच परवडेल असेही त्यांचे मत आहे.

शेतकरी संघटनेचे कार्यकत्रे सुरेश ताके यांचे कर्नाटक, बिहार, उत्तराखंड, गुजरात, मध्यप्रदेश प्रमाणे राज्यात बाजारपेठेकडे लक्षच दिले जात नाही. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्याचे त्यांचे मत आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर क्षीरसागर यांच्या मते निसर्गावर दर अवलंबून असतात. अति पाऊस झाला किंवा कमी पाऊस झाला तर उत्पादन घटून दर वाढतात. पण अनुकूल हवामान असेल तर उत्पादन अधिक येऊन दर घटतात. राज्यात ५५ हजार हेक्टर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली जाते. पण दरात फार मोठी तेजी – मंदी नसल्याने शितगृहांमध्ये टोमॅटो ठेवले जात नाही. शेतकऱ्यांचा शेतमाल विकला अन् तो मोठय़ा शहरातील ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत ४ ते ६ पटीने खर्च वाढतो. त्याला व्यापाऱ्यांना जबाबदार धरले जात असले तरी ते एकमेव वास्तव नाही. टोमॅटोची वाहतूक, आडते, व्यापारी, विक्रेते ही साखळी मोठी असून माल खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. घाऊक बाजारातील दराचा विचार न करता किरकोळ विक्रिच्या दरावरुन नेहमी चर्चा घडविली जाते. पण मुळाशी जाऊन वास्तवाचा लेखाजोखा मांडला जात नाही. वर्षांनुवर्षे ठरावीक दराने भाजीपाला खरेदी करण्याची मानसिकता वाढीस लागली आहे. तीदेखील बाजारपेठेच्या अस्थर्याला कारणीभूत आहे. कधी लाल चिखल ते कधी लाल सोने असा खेळ शेतकऱ्यांच्या नशिबी कायमचाच ठरलेला आहे. नफ्यातोटय़ाचे अर्थशास्त्र समजून घेतले नाही तर भविष्यात भाजीपाल्यातही महाराष्ट्र शेवटच्या क्रमांकावर जायला वेळ लागणार नाही. टोमॅटो उत्पादकांना सरकारच्या आíथक मदतीची गरज नाही, पण खरी गरज आहे ती बाजारपेठ सक्षम करण्याची.

  • दुसरे एक आडते सुभाष होळकर यांच्या म्हणण्यानुसार सर्वात प्रथम सर्जकिल स्ट्राइकचा फटका बसला. पाकिस्तानला २०० ते ३०० मोटारी येथून जात होत्या. त्या थांबल्या, दर घटले.
  • नियमनमुक्तीनंतर तर पुरती वाट लागली. निश्चलनीकरणामुळे आता परप्रांतातील विक्रेते यायला तयार नाही.
  • देशभर ग्राहकांची मागणी घटली आहे. त्यामुळे सध्या दर जास्त असले तरी ते टिकतील का नाही हे सांगणे कठीण आहे. मात्र या सर्व प्रश्नांचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. गेली दोन वर्ष दर नसल्याने नुकसान सहन करावे लागल्याने मुठेवाडगाव (ता. श्रीरामपूर) येथील विश्वनाथ मुठे यांनी यंदा लागवडच केलेली नाही. ते स्वत श्रीरामपूर बाजार समितीचे संचालक आहेत. बाजारात ग्राहकांची मागणी घटली.
  • शेतमालाला दर नाही, आत्ता टोमॅटोचे भाव वाढले असले तरी या दराने घ्यायला ग्राहक नाही. एकुणच अनेक समस्या निर्माण झाल्या असून अस्थर्य वाढीस लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ashoktupe@expressindia.com