Ambyacha Panache Toran : भारतीय संस्कृतीत आंब्याच्या पानांना विशेष महत्त्व आहे. कोणतेही शुभकार्य असो, आंब्याच्या पाने पूजेसाठी वापरली जातात.याशिवाय आंब्याच्या पानांपासून सुंदर तोरण तयार केले जाते. सध्या दिवाळी सुरू आहे. दिवाळीत घरी दारात तोरण बांधण्यासाठी आणि पूजेसाठी आंब्याचे पाने वापरतात. आंब्याच्या पानांपासून सुंदर तोरण कसे तयार करायचे, याविषयी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये हटक्या पद्धतीने तोरण कसे बनवायचे, हे दाखवले आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आंब्याची पाने आणि पांढऱ्या शेवंतीची फुले दिसत आहे.व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक आंब्याचं पान घेतात. या पानाचं देठ कात्रीने कापतात. त्यानंतर पानांच्या मध्यभागी असलेल्या रेषेच्या दोन्ही बाजूला अर्ध्यापर्यंत कात्रीने कापतात आणि व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे त्या पानाचे सुंदर फुल तयार करतात. सर्व पानांचे असेच फुल बनवून घेताता आणि पांढऱ्या शेवंतीचे फुले आणि आंब्याच्या पानांची फुले वापरुन सुंदर तोरण बनवताना दिसत आहे. तोरण बनवण्याची ही हटके पद्धत तुम्ही दिवाळीत घरी करू शकता.

हेही वाचा : VIDEO : किती तो निरागसपणा! आरशात पाहून स्वत:वरच भुंकत होता कुत्रा, पाहा मजेशीर व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

world_of_spr या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आंब्याच्या पानांचं तोरण”या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी ही हटके पद्धत आवडली आहे. एका युजरने लिहिलेय, “खूप छान.. मी सुद्धा असेच बनवतो” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर व्हिडीओ”