राज्यभरात १४९५ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातल्या करोनाग्रस्तांची संख्या २५ हजार ९२२ झाली आहे. मागील २४ तासात ५४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत राज्यात ९७५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान आज राज्यात ४२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ५ हजार ५४७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या १५ हजार ७४७ इतकी झाली आहे. तर मुंबईत करोनाची लागण होऊन ५९६ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज जे ५४ मृत्यू झाले त्यापैकी मुंबईत ४०, पुण्यात ६, जळगावात २, सोलापूरमध्ये २, औरंगाबादमध्ये २, वसई विरारमध्ये १ तर रत्नागिरीत १ मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी ३३ पुरुष तर २१ महिला आहे. ५४ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्या वयाच्या वरील रुग्ण हे २९ होते. तर २१ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. ४ रुग्ण हे ४० वर्षांखालील होते. ५४ पैकी ३६ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे आजार होते. करोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ९७५ झाली आहे अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २ लाख ३० हजार ८५७ नमुन्यांपैकी २ लाख ३ हजार ४३९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनासाठी निगेटिव्ह आले आहेत. तर २५ हजार ९२२ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९८ हजार २१३ जण होम क्वारंटाइन आहेत. तर १४ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत, असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं.