रायगड जिल्ह्यात २४ तासात करोनाचे २३५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात २५२ जणांनी करोनावर मात केली आहे. तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार ३५९ करोनाचे रुग्ण आहेत. तर ३ हजार ३०४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाचा प्रादुर्भाव वेगाने सुरुच आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल २३५ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ५ हजार ८३४ वर पोहोचली आहे. ३३९ जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात २३५ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील ९०, पनवेल ग्रामीणमधील २४, उरण मधील १४, खालापूर ११, कर्जत ५, पेण १५, अलिबाग १९, मुरुड ७, रोहा १७, श्रीवर्धन १५, म्हसळा १६, महाड २ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा, उरण, पेण, अलिबाग, मरुड येथे प्रत्येकी एक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात २५२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील २२ हजार १४९ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार ३४९ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ११९०, पनवेल ग्रामीण हद्दीतील ३५९, उरण मधील ११३,  खालापूर १३६, कर्जत ४४, पेण १०७, अलिबाग १३०,  मुरुड २३, माणगाव ५०, तळा येथील १, रोहा ११०, सुधागड ५, श्रीवर्धन ३४, म्हसळा २२, महाड ३३, पोलादपूर मधील २ करोनाबाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १७१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची प्रमाण ५७ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के आहे.

जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवीमुंबई प्रमाणे रायगड जिल्ह्यातही प्रतिंबधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 235 new corona patients in 24 hours in raigad district five people died msr
First published on: 07-07-2020 at 20:30 IST