News Flash

अकोल्यात ११ सिलिंडरच्या स्फोटांमुळे अग्नितांडव

झोपडय़ांमधील सुमारे १५ सिलिंडर सुरक्षित ठिकाणी हलविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

११ सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत ६० झोपडय़ा भस्मसात झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

६० झोपडय़ा भस्मसात

शहरातील माता नगरमध्ये ११ सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत ६० झोपडय़ा भस्मसात झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. झोपडय़ांमधील सुमारे १५ सिलिंडर सुरक्षित ठिकाणी हलविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याजवळ असलेल्या माता नगर झोपडपट्टीतील एका घरातील सिलिंडरला अचानक गळती सुरू झाली. काही वेळात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घरासह कुडाच्या काडय़ा व लाकडांना आग लागली. ही आग आजुबाजूला पसरून लगतच्या झोपडय़ांनाही लागली. त्या आगीमुळे जवळच्या घर व झोपडय़ांमधील तब्बल ११ सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसर हादरून काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या व खासगी पाण्याच्या तब्बल ५० बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करण्यात आले. अथक परिश्रमानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. माता नगरला लागूनच असलेल्या रामदासपेठ पोलीस वसाहतमध्येही या आगीची झळ पोहोचली. त्यामुळे वसाहत तातडीने खाली करण्यात आली. या आगीमूळे माता नगरासह पोलीस वसाहत व बाजुला असलेल्या दोन शाळेतील विद्यार्थ्यांनाही प्रचंड त्रास झाला. माता नगर झोपडपट्टीला लागून असलेल्या उर्दु शाळेसह नूतन हिंदी शाळेतील विद्यार्थ्यांना आग लागल्याचे दिसताच त्यांनी प्रचंड आक्रोश केला. या आगीत माता नगरातील संपूर्ण झोपडपट्टय़ा भस्मसात झाल्या. अनेक घरांमधील नागरिकांचे दागिने व मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 3:27 am

Web Title: 60 slum ablazed in 11 cylinder explosion in akola
Next Stories
1 रामदेव बाबांचा काळे झेंडे दाखवून निषेध
2 छिंदम प्रकरणावरून शिवसेना-भाजप सदस्यांत खडाजंगी
3 उदयनराजेंच्या वाढदिवसाला सर्वपक्षीय नेते
Just Now!
X