News Flash

VIDEO: अरे बापरे! चोराने करोना रुग्णांसोबत रुग्णवाहिका पळवली, नगरमध्ये रंगला थरार

रुग्णवाहिकेच्या शोधात एकच धावपळ

करोना रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका चोरांनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे हा प्रकार घडला आहे. चालक नसल्याचं पाहून चोराने रुग्णवाहिका पळवली होती. सुदैवाने रुग्णवाहिका सापडली आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

घारगाव येथील लक्ष्मी हॉटेलजवळ उभी असलेल्या रुग्णवाहिकेत करोना रुग्ण होते. रुग्णांना उपचारासाठी नेलं जात होतं. रूग्णवाहिकेचा चालक काही वेळासाठी बाहेर गेल्याचं पाहून आरोपी वैभव सुभाष पांडे याने संधी साधली. आरोपीने रुग्णवाहिका घारगाव येथून संगमनेरच्या दिशेला पळवण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिकेचे मालक योगेश महादू गोमटे यांना माहिती मिळताच त्यांनी संगमनेर येथील आपल्या मित्रपरिवाराला हा सगळा प्रकार सांगितली.

त्यानंतर सर्वांनीच रुग्णवाहिकेचा शोध घेण्यास सुरुवात केली. रुग्णवाहिका संगमनेरमध्ये असल्याचं समजतात या रुग्णवाहिकेला सर्वांनी घेराव घातला. आरोपी सुभाष पांडे याला संगमनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 1:59 pm

Web Title: ambulance with corona patient theft in sangamner ahmednagar sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 देशात मोदी कायदा आलाय का?; नवाब मलिकांचा फडणवीसांवर पलटवार
2 महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाउन लावा; भुजबळांची उद्धव ठाकरेंकडे मागणी
3 “महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याला रात्री दोन वाजता धावाधाव करावी लागते, हे मोठं दुर्दैव”
Just Now!
X