News Flash

औरंगाबाद – शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा!

कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात घातला होता गोंधळ .

संग्रहीत

औरंगाबादमध्ये २० मे २०१८ च्या मध्यरात्री झालेल्या जातीय दंगली प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी जैस्वाल यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील खुर्चा, काचांची मोडतोड करून पोलिसांना शिवीगाळ केली होती.  या प्रकरणी आता शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

विविध गुन्ह्यात प्रत्येकी सहा महिन्याची शिक्षा असली तरी ती एकत्रच भोगावयाची आहे. अतिरिक्त व जिल्हा सत्र न्या. एस. एम. भोसले यांनी शिक्षेचा निर्णय सुनावला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार चंद्रकांत निवृत्ती पोटे यांनी फिर्याद दिली होती.

पोलीस ठाण्यात गोंधळ; शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांना अटक

सरकारी कामाता अडथळा निर्माण केल्याप्रकरणी औरंगाबादमधील मध्य विधानसभा मतदार संघाचे शिवससेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा व ५ हजार रुपये दंड ठोठवला गेला आहे. कलम ३५३ नुसार सहा महिने कारावास आणि २५०० रुपये दंड, किंवा दंड न भरल्यास एक महिना शिक्षा ठोठवली गेली आहे. तसेच, कलम ५०६ नुसार सहा महिने कारावास व अडीच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी सरकारी अभियोक्ता म्हणून ए.एस.देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 4:30 pm

Web Title: aurangabad shiv sena mla pradip jaiswal sentenced to six months msr 87
Next Stories
1 “दिल्लीत गेल्यावर तेवढं मोदींना सांगा,” कार्यक्रमात भाषणादरम्यानच पवारांची रामदास आठवलेंना विनंती
2 महत्त्वाची बातमी : मराठा समाजाला १० टक्के EWS आरक्षण; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
3 मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट
Just Now!
X