20 September 2020

News Flash

तलावात बैलगाडी कोसळून चार जणांचा मृत्यू

बैलाचा पाय घसरल्याने बैलगाडी तलावात कोसळल्याने एकाच कुटूंबातील चौघांसह दोन बैल आणि एक गाय यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथे घडली.

| October 13, 2014 02:39 am

बैलाचा पाय घसरल्याने बैलगाडी तलावात कोसळल्याने एकाच कुटूंबातील चौघांसह दोन बैल आणि एक गाय यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथे घडली. या घटनेत तीन जणांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले असून त्यांच्यावर पारोळ येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कन्हेरे येथील विक्रम पाटील (६५) हे सकाळी दहाच्या सुमारास कुटुंबियांना बैलगाडीतून शेतात घेऊन जात होते. तलावाजवळील रस्त्याने गाडी जात असताना एका बैलाचा पाय घसरल्याने बैलगाडी तलावात कोसळली.
या घटनेत विक्रम पाटील यांच्यासह त्यांची पत्नी पद्माबाई (६०), सून मनिषा (३०), नातू मयूर (१०) यांचा बुडून मृत्यू झाला. परिसरातील ग्रामस्थांनी त्वरीत मदतकार्य सुरू केल्याने कल्पनाबाई संजय पाटील (३५), समाधान विक्रम पाटील (३५), भुरा समाधान पाटील या तिघांचा प्राण वाचू शकला. पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 2:39 am

Web Title: cart fall in lake 4 killed in jalgaon
Next Stories
1 मतदानापूर्वी ऊसतोडणी मजुरांना जिल्ह्य़ाबाहेर हाकलण्याचा डाव
2 ‘डॉक्टर’ आम्ही तुमच्याबरोबर..!
3 एनसीपीचा शब्दविस्तार ‘नॅचरल करप्ट पार्टी- मोदी
Just Now!
X