22 March 2019

News Flash

पिंपरी-चिंचवड मध्ये संगणक अभियंत्यांची गळफास घेऊन आत्महत्या

अभियंत्याच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत

अभिजित रामदास मुळे (वय-३८ रा.गिरिराज सोसायटी बिजली नगर चिंचवड) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

पिंपरी-चिंचवड मध्ये संगणक अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.ही घटना आज सकाळी १०.३० च्या सुमारास चिंचवडच्या बिजली नगर भागात घडली,राहत्या घरी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अभिजित रामदास मुळे (वय-३८ रा.गिरिराज सोसायटी बिजली नगर चिंचवड) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,अभिजित रामदास मुळे या इसमाने राहत्या घरी साडेदहाच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली,त्यावेळी घरात कोणी नव्हते.अभिजित हे टी.सी.एस कंपनीत संगणक अभियंता होते अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे.काही वर्षांपूर्वीच अभिजितचा विवाह झाला होता, अभिजित त्याची पत्नी आणि त्याचा लहान भाऊ हे चिंचवड येथे राहात होते. मात्र आज सकाळी घरी कोणी नसताना अभिजित ने गळफास घेऊन आत्महत्या केली.

First Published on August 10, 2018 6:58 pm

Web Title: computer engineer commits suicide in pimpri chinchwad