05 June 2020

News Flash

थाळ्या-टाळ्या वाजवणे महत्त्वाचेच होते… देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

थाळ्या किंवा टाळ्या वाजवणे अथवा दिवा लावणे हा लॉकडाउनमधील महत्वाचा भाग आहे. कारण,

२२ मार्च रोजी घेण्यात आलेल्या जनता कर्फ्यूवेळी मोदी यांनी देशवासीयांना टाळ्या आणि थाळी वाजवण्याचं आवाहन केले होते. त्यानंतर पाच एप्रिल रोजी रात्री ९ मिनिटांसाठी घरातील लाइट बंद करून पणती, दिवा किंवा मोबाइलचा फ्लॅश लावून एकतेचं दर्शन घडावावे अशी विनंती केली होती. मोदींच्या या दोन्ही आवाहनाला जनतेमधून चांगला प्रतिसाद मिळाला मात्र काही नेत्यांनी आणि विरोधकांनी यावर टीका केली. याच टीकेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत सडेतोड उत्तर दिले आहे.

थाळ्या किंवा टाळ्या वाजवणे अथवा दिवा लावणे हा लॉकडाउनमधील महत्वाचा भाग आहे. कारण, आपले हेल्थ वर्कर सर्वात जास्त स्ट्रेसमध्ये आहेत. त्यांना एकटेपणा जाणवतोय. त्यांना असं वाटतेय की एका संकटाचा सामना आम्ही करतोय. त्यावेळी प्रत्येक व्यक्तीला तो कितीही मोठा असो. त्या व्यक्तीला मानसिक आधाराची गरज असते. कोणीतरी त्यांना म्हणावे लागते की आम्ही तुमच्या सोबत आहोत. देशांमध्ये गरीब आहेत त्यांना उद्या काय होणार हे माहित नाही, अशआ लोकांनाही मानसिक आधाराची आवश्कता आहे. म्हणून या दोन्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून हा देश एक आहे. कोणीही एकटा लढत नाही. आपण सगळे मिळून लढतोय. ही भावना मोदी यांनी तयार केली. काही लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनावर टीका केली. या टीकाकारांना जनतेने आपल्या कार्यातून उत्तर दिले. कारण आपण फक्त थाळ्या-टाळ्या वाजवत नाही तर जमिनीवरील कर्तुत्व सिद्ध केले आहे. असं मत फडणवीस यांनी मुलाखतीत व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मुद्यावर चर्चा केली. राज्य सरकारचे कामकाज कसं आहे. लॉकडाउनमध्ये वेळेवर घेतला आहे. मरकजमध्ये सहभागी झालेले किती लोक राज्यात आहेत. हे अजूनही राज्य सरकार शोधू शकलेलं नाही. त्यामुळे राज्य सरकार यात ढिलाई दाखवत आहे का? या संकटाच्या वेळीही राज्य सरकार मतांचं राजकारण करत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे, असे अनेक सडेतोड उत्तरे फडणवीस यांनी मुलाखतीत दिली आहे. पाहा…देवेंद्र फडणवीस यांची ‘लोकसत्ता Exclusive मुलाखत. त्यात त्यांनी अनेक प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 11:29 am

Web Title: coronavirus devendra fadnvis exclusive interview nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रावर करोनानंतर आता ‘सारी’चं संकट, औरंगाबादमध्ये १० जणांचा बळी
2 Coronavirus : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात करोनाचा पहिला बळी
3 वर्धा : आरा मशीन केंद्रास आग; लाखोंचे सागवानी लाकूड खाक
Just Now!
X