29 February 2020

News Flash

दीपक केसरकर यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आज शिवसेनेत जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

| July 13, 2014 02:15 am

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आज शिवसेनेत जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. येत्या आठ दिवसांमध्ये आपण राजीनामा देणार असून राष्ट्रवादीने सावंतवाडीत उमेदवार शोधावा असे केसरकर यांनी म्हटले.
ही लढाई नारायण राणे या व्यक्तीविरुद्ध नाही तर राणे या प्रवृत्तीच्या विरोधात आहे असं सांगत आपण राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राणेंच्याविरोधात यापुढेही लढत राहणार, असेही ते यावेळी म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी होणार आहे. या आघाडीत काँग्रेसचे नेते नारायण राणे असतील. सिंधुदुर्गात लोकसभा निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाली आहे, तीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार आहे. त्यापेक्षा सरळ शिवसेनेत जाण्याची तयारी करा असा सल्ला पदाधिकारी व कार्यकर्ते केसरकर यांना देत होते.

First Published on July 13, 2014 2:15 am

Web Title: deepak kesarkar on a path of shivsena
Next Stories
1 विरोधी पक्षनेतेपदावरून कराड पालिकेत गोंधळ
2 पित्याचा दौरा पूर्ण करण्यासाठी पंकजा मुंडे आजपासून सक्रिय
3 मराठी संमेलनाध्यक्षपदासाठी डॉ. श्रीपाल सबनीस िरगणात वार्ताहर, उस्मानाबाद
X
Just Now!
X