News Flash

मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार गोंधळलेल्या अवस्थेत-फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडली. त्यांचं म्हणणं हे आहे की विरोधक ओबीसी आरक्षणाबाबत काही गोष्टी पसरवत आहेत. मात्र आम्ही हे त्यांना सांगू इच्छितो की सत्ता पक्षातले मंत्रीच या गोष्टी पसरवत आहेत. त्यांचेच आमदार पत्रही देत आहेत. त्यामुळे अशा मंत्र्यांवर आणि ओबीसी समाजात संभ्रम निर्मा करणाऱ्यांवर मुख्यमंत्री कारवाई करणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

Interacting with Media at Vidhan Bhavan#WinterSession https://t.co/KzeFmtiMJn

शेतकऱ्यांच्या तोंडाला या सरकारने पानं पुसली आहे. शेतकऱ्यांना या सरकारने कोणतीही मदत केलेली नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याविषयीची भूमिका या सरकारने घेतली होती त्या भूमिकेचा सरकारला विसर पडला आहे. हे अधिवेशन घेण्यामागे फक्त आटपून टाकायचं हीच भूमिका दिसून आली.  शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्ही जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं आम्हाला मिळू शकलेली नाहीत. तीच बाब मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही दिसून आली असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 7:10 pm

Web Title: government in a state of confusion regarding maratha reservation says devndra fadnavis scj 81
Next Stories
1 शासकीय कर्मचाऱ्यांच्या वस्रसंहितेचा पुनर्विचार करणार : अजित पवार
2 चीननं १५ दिवसांत रुग्णालय उभारल्याचं कौतुक, मग मुंबईचं फिल्ड रुग्णालय कौतुकास्पद नाही का? : मुख्यमंत्री
3 फडणवीस दिल्लीत जावेत ही मुनगंटीवारांची इच्छा : उद्धव ठाकरे
Just Now!
X