महाराष्ट्रात मागील दोन दिवसात १२९ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात आत्तापर्यंत ३ हजार ३८८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात ३६ पोलिसांचा करोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. तर ३ हजार ३८८ पैकी आत्तापर्यंत १९४५ पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

ठाण्यात करोना झालेल्या पोलिसांची संख्या २४६ पैकी १४६ पोलीस बरे झाले आहेत. इतर पोलिसांवर विविध रुग्णालयांवर उपचार सुरु आहेत. ठाणे शहर पोलीस दलातील २४६ पोलिसांना करोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये २२२ पोलीस कर्मचारी आणि २४ अधिकाऱ्यांचा सामावेश आहे. यातील सर्वाधिक रुग्ण ठाणे पोलीस मुख्यालयातील असून त्यांची संख्या ४७ आहे. राज्य राखीव पोलीस दलातील २६, मुंब्रा पोलीस ठाण्यातील १९, कळवा पोलीस ठाण्यातील १६, गुन्हे अन्वेषण शाखा आणि नियंत्रण कक्षातील प्रत्येकी १२ पोलीस करोनाबाधित आहेत.