कोल्हापूर शहरातील एका माजी सैनिकाने शुक्रवारी स्वतःच्या पिस्तुलातून डोक्यात गोळी मारुन घेत आत्महत्या केली. दिनकर पांडूरंग मगदूम ( वय ४५ ) असे त्यांचे नाव आहे. कौटुंबिक करणातून ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे.
मगदूम हे काही महिन्यांपूर्वी सैन्यातून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांची पत्नी व मुलं काही दिवसांपूर्वी पाचगाव ता. करवीर येथील भावाकडे राहण्यास गेले होते. त्यामुळे ते जिवबा नाना पार्क भागात घरी एकटेच राहत होते. दरम्यान, आज त्यांनी स्व:ताच्या पिस्तुलातून डोक्यात गोळी मारुन घेत आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर करवीरचे पोलीस उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील घटनास्थळी दाखल झाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 21, 2020 7:16 pm