News Flash

विवेक- ऐश्वर्याच्या लग्नाला नागराज मंजुळे का राहिले उपस्थित?

या खास लग्नाला नागराज मंजुळेंसह बरेच नामवंत व्यक्ती उपस्थित होते.

विवेक - ऐश्वर्या

कंजारभाट समाजातल्या कौमार्य चाचणीच्या प्रथेला विरोध करत विवेक आणि ऐश्वर्याने सहजीवनाची शपथ घेतली. या अनिष्ट प्रथेविरोधात या दोघांनी वाचा फोडली. म्हणूनच विवेक तमाईचिकर आणि ऐश्वर्या भाट यांच्या लग्नाचे साक्षीदार दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासारखे समाजातले अनेक नामवंत झाले.

ऐश्‍वर्या आणि विवेक या जोडीने कौमार्य चाचणीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला होता. कौमार्य चाचणी करायची नाही या अटीवर ठाम असणाऱ्या विवेक यांच्या कुटुंबीयांवर जातपंचायतीकडून दबाव टाकला जात होता. मात्र ऐश्वर्याच्या आणि इतर तरुणांच्या साथीनं ही लढाई लढण्याचं विवेकनं ठरवलं होतं. सहा महिन्यांपासून कौमार्य चाचणीविरुद्ध हा लढा सुरू होता. त्यामध्ये या समाजातील अनेक तरुण-तरुणी सहभागी झाले होते. या प्रथेच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी विवेक तमाईचिकर आणि प्रशांत इंद्रेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ‘Stop The v ritual’ नावाने व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला. या ग्रुपवरून त्यांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली. या काळात त्यांना अनेकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. मात्र या धमक्यांना बळी न पडता, न घाबरता आपला लढा सुरू ठेवून अखेर विवेक आणि ऐश्वर्या विवाहबद्ध झाले.

या विवाह सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे, यांच्यासह बरेच सामाजिक कार्यकर्ते या लग्नाला उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 2:27 pm

Web Title: nagraj manjule attended vivek tamaichikar and aishwarya wedding who protested against kanjarbhat community virginity test
Next Stories
1 राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा ‘म्होरक्या’च्या निर्मात्याची आत्महत्या
2 …तर शिवसेनेत मोठी फूट पडेल, रामदास आठवलेंचा इशारा
3 पुणे : म्हाडाच्या 3139 सदनिका आणि 29 भूखंडांसाठी सोडत, कसा व कुठे कराल अर्ज?
Just Now!
X