अमेरिकेतील नासा या विज्ञान संस्थेत कार्यरत असणारं एक मराठी नाव म्हणजे प्रणित पाटील. मराठी माती विषयी वाटणारी ओढ आणि समाजाच्या प्रगतीचा विचार यातून प्रणित पाटील यांनी त्यांचं वेगळेपण सिद्धही केलं आहे. लॉकडाउनमुळे ते भारतात आहेत. त्यांना अमेरिकेत जाता आलेलं नाही. मात्र तरीही घराबाहेर पडून त्यांनी आपल्या समाजाच्या व्यथा आणि अडचणी जाणून घेतल्या. आगरी आणि कोळ्यांच्या परंपरेने चालणाऱ्या मासेमारी व्यवसायात त्यांना काही त्रुटी जाणवल्या. तसेच आपल्या बांधवांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होतोय हेदेखील कळलं. यावर तोडगा म्हणून आगरी कोळ्यांचा पारंपरिक व्यवसाय ऑनलाइन माध्यमातून राज्यभरात पोहचवण्याची मोट बांधली आणि त्यातून निर्मिती झाली ती बोंबिल अॅपची. मूळचे अलिबागचे असणारे प्रणित पाटील यांच्या मनात हा विचार कसा आला. नासामधला त्यांचा अनुभव तिथे पोहचण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत या सगळ्याविषयी आपण लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत.

अमेरिकेतील नासामध्ये कार्यरत असणारे तरुण शास्त्रज्ञ प्रणीत पाटील हे रविवारी सकाळी ११ वाजता लोकसत्ता डिजिटल अड्डावर येत आहेत. त्यांना तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही विचारु शकता. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यासाठी आमच्या लाइव्हच्या लिंकवर क्लिक करा आणि विचारा प्रश्न उद्या सकाळी म्हणजेच १४ जून रोजी सकाळी ११ वाजता.