News Flash

नाशिकमध्ये लष्कराचे सुखोई विमान कोसळले

पिंपळगावजवळील शिरवाडीजवळ ही घटना घडल्याचे वृत्त असून तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर येत आहे.

सुखोई विमान

नाशिकमध्ये पिंपळगावजवळ लष्कराचे सुखोई विमान कोसळल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. पिंपळगावजवळील शिरवाडी येथे ही घटना घडल्याचे वृत्त असून तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे.

पिंपळगाव परिसरातील वाव ठुशी परिसरात लष्कराचे सुखोई विमान कोसळले. विमान कोसळण्यापूर्वी वैमानिक आणि सहवैमानिकाने पॅराशूटच्या आधारे उडी मारल्याने ते दोघेही सुखरुप आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी दिली.  तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याचा अंदाज आहे. या दुर्घटनेत विमान जळून खाक झाल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2018 11:33 am

Web Title: nashik army helicopter crash due to possible technical failure in pimpalgaon
Next Stories
1 मराठी पाऊल पडते पुढे! सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत तेलुगूला टाकले मागे
2 अतिकामामुळे कर्मचाऱ्याने आत्महत्या केली तर बॉस जबाबदार नाही – सुप्रीम कोर्ट
3 गुड न्यूज! पर्यटकांची प्रतीक्षा संपली, लोणावळ्याचा भुशी डॅम ओव्हरफ्लो
Just Now!
X