11 August 2020

News Flash

सोलापुरात दुस-या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपले

सोलापूर शहर व परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वा-यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विद्युत ताराही तुटून पडल्यामुळे खंडित झालेला

| May 28, 2014 04:00 am

सोलापूर शहर व परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वा-यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विद्युत ताराही तुटून पडल्यामुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत पूर्ववत झाला नव्हता.
दरम्यान, सोमवारी सायंकाळीही वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाल्याने त्यात अक्कलकोट रस्त्यावरील मल्लिकार्जुन नगरात घराची भिंत अंगावर कोसळून गणेश संजय कट्टीमनी (१२, रा. भवानी पेठ, सोलापूर) या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. तो काही दिवसांपूर्वी आपल्या मामाच्या घरी मल्लिकार्जुन नगरात आला होता. या दुर्घटनेमुळे कट्टीमनी कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. मृत गणेश हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता.त्यानंतर मंगळवारी दुस-या दिवशी पुन्हा अवकाळी पाऊस व वादळी वा-यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, मंगळवारी सोलापूरचे तापमान ३९.९ अंशापर्यंत नोंदले गेले.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2014 4:00 am

Web Title: odd time rain in solapur
Next Stories
1 सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस
2 महिला सरपंचासह सदस्यांना पाण्यासाठी ग्रामस्थांनी कोंडले
3 हर्षवर्धन पाटील यांनी पराजयाचे खापर फोडले कार्यकर्त्यांवर
Just Now!
X