News Flash

SSC- HSC Exam Timetable : इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

SSC HSC Exam Timetable announced by the Maharashtra State Board : दहावीची ३ मार्च तर बारावीची १८ फेब्रवारीपासून परीक्षा सुरू होणार

SSC- HSC Exam Timetable announced :महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रवारी – मार्च २०२० मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारवीच्या परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च २०२० तर बारावीची परीक्षा १८ फेब्रवारी ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे.

या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई,नागपूर,औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांच्यावतीने इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे.

तसेच, परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळांना तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल असे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले  आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली वेळापत्रक ग्राह्य धरू नये, परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळाने छापील स्वरुपात दिलेली वेळापत्रकेच अंतिम असतील. या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून पालकांसह विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2019 3:30 pm

Web Title: schedule for class ten and twelve declared msr 87
टॅग : Hsc,Ssc
Next Stories
1 आठ दिवसांपासून रुग्णालयात असलेल्या लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा
2 “राजकारणात फायदा-तोटा न पाहता बाळासाहेबांनी प्रसंगी काँग्रेसला देखील पाठिंबा देवू केला”
3 ‘आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत, हा घ्या पुरावा’; राष्ट्रवादी काँग्रेसचे ट्विट
Just Now!
X