04 July 2020

News Flash

सोनू सूदच्या कार्याचं राजकीय वर्तुळात कौतुक; रोहित पवारांनी घेतली भेट

सामान्य जनतेपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी सोनूच्या कार्याची दखल घेतली आहे

गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेता सोनू सूद अहोरात्र मजुरांसाठी झटत आहे. प्रत्येक मजूर त्यांच्या गावी सुखरुप पोहोचावा यासाठी सोनू सूदचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे त्याच्या या कार्याचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे. यामध्येच राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनीही सोनू सूदचं कौतुक करत त्याची भेट घेतली आहे.

रोहित पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत सोनू सूदची भेट घेतल्याचं म्हटलं आहे. ‘घर जाना हैं’, हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरुप पोचवणाऱ्या @SonuSood यांची आज त्यांच्या घरी भेट घेतली, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, सोनू सूदने आतापर्यंत विविध मार्गाने गरजुंची मदत केली आहे. मजुरांना गावी पोहोचवण्यासाठी त्याने बसची सेवा सुरु केली होती. तसंच रमजानच्या महिन्यात त्याने अनेकांना जेवण उपलब्ध करुन दिलं होतं. विशेष म्हणजे इतक्यावरच न थांबता त्याने त्याचे हॉटेल्सदेखील डॉक्टर, पोलीस यांच्यासाठी खुले केले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी सोनूच्या कार्याची दखल घेतली आहे. त्यामुळे पडद्यावर क्रूर खलनायक साकारणारा सोनू सूद आता खऱ्या आयुष्यात नायक ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 9:32 am

Web Title: sonu sood meets karjat jamkhed mla rohit pawar ssj 93
टॅग Coronavirus
Next Stories
1 BlacksLivesMatter वर पोस्ट शेअर केल्यामुळे सारा अली खान ट्रोल; नेटकरी म्हणतात…
2 चित्रीकरण ठप्प असले तरी चित्रनगरी सुरूच
3 माझ्यावर १०० कुटुंबांची जबाबदारी, एक एक सामान विकून करतोय मदत- रॉनित रॉय
Just Now!
X