28 September 2020

News Flash

आता Paytm वर मिळणार ‘एसटी’चं तिकिटं

'पेटीएम' आणि 'महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा'ची (एसटी) भागीदारी

आता विमान आणि रेल्वेप्रमाणे एसटी बसच्या तिकीटांचंही ऑनलाइन आरक्षण करता येणार आहे. कारण, अग्रगण्य मोबाइल वॉलेट अॅप ‘पेटीएम’ने ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा’शी (एसटी) भागीदारी केली आहे.

ऑनलाइन पद्धतीने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेळ वाचवणारा होणार आहे. पेटीएमसोबत झालेल्या भागीदारीमुळे आता प्रवासी पेटीएम अॅप आणि वेबसाइटवरून तिकिटे आरक्षित करू शकणार आहेत. याद्वारे प्रवासी शिवशाही, एसी-शिवनेरी, नाइट एक्स्प्रेस, ऑर्डिनरी एक्स्प्रेस, डे ऑर्डिनरी, शिवशाही स्लीपर, सेमी लक्झरी आदी बसचे तिकीट आरक्षित करु शकतात. याबाबत बोलताना महाराष्ट्र आणि शेजारच्या काही राज्यांमधील बस सेवांमध्ये तिकिटे आरक्षित करण्यासाठी प्रवासी पेटीएम अॅप आणि वेबसाइटवरून तिकिटे आरक्षित करू शकतील.

याबाबत बोलताना, “बसच्या प्रवाशांना सुलभतेने आणि सोयीस्कररीत्या बस तिकीट आरक्षित करता यावे यासाठी आमच्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करता येणार आहे. महाराष्ट्र आणि शेजारच्या काही राज्यांमधील बस सेवांमध्ये तिकिटे आरक्षित करण्यासाठी प्रवासी पेटीएम अॅप आणि वेबसाइटवरून तिकिटे आरक्षित करू शकतील”, अशी प्रतिक्रिया टीएमचे उपाध्यक्ष अभिषेक राजन यांनी दिली.

पेटीएमची ऑनलाइन एसटी तिकीट सेवा या आधीपासूनच आंध्र प्रदेश परिवहन, राजस्थान परिवहन, गुजरात परिवहन, ओडिशा परिवहन, तमिळनाडू परिवहन महामंडळ येथे सुरू आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 12:54 pm

Web Title: st tickets can be booked from paytm sas 89
Next Stories
1 बीडमध्ये अल्पवयीन भावाने केली बहिणीच्या प्रियकराची हत्या
2 ओएनजीसी गॅस प्लांटमधील आग आटोक्यात; तीन जवानांसह चौघांचा मृत्यू
3 एवढे येऊ नका की आम्हालाच पक्षाबाहेर काढाल!
Just Now!
X