तेलंगाणा राज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकाने सिंचन बजट वाढवावे अशा सुचना नितीन गडकरी यांनी सुक्ष्म सिंचन परिषदेत केली होती. त्यावर बोलतांना मुनगंटीवार म्हणाले की, तेलंगाना राज्याचा सिंचन बजेट हा संपुर्ण सिंचन कामाचा बजट एकत्र दाखवण्या येतो, त्यामुळे त्यांची आकडेवारी जास्त दिसून येत असेल. परंतू आपल्या राज्याचा सिंचन बजेट तुलनेने कमी जरी असला तरी आपला जलयुक्त शिवार, शेततळे, कोल्हापुरी बंधारे, अशा विविध माधामातून वेगळी वेगळी तरतूद करतो त्यामुळे कमी वाटत असेल, मात्र आपले बजेट फार कमी नाही. त्यामुळे अशी आकडेवारी बघून गदाचीत नितीन गडकरी यांना गैर समज झाला असेल असा खुलासा सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

राज्याचे बजेट लोकसभा निवडणूक आचारसहिंता संपल्या नंतर माडण्यात येणार आहे. मात्र त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांला विकास काम करण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक विभागाच्या आर्थिक नियोजनच्या बैठका घेण्यात येत आहे. यात आरोग्य, शिक्षण आणि रोजगारावर भर देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांना देण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी दिल्या आहे.

गुरूवार दि.१७ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षीक नियोजन बैठकीत आयोजित करण्यात आली होती. यानंतर मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विषयावर सरकार नेहमीच सकारात्मक विचार करत आली असून दुष्काळात शेतकऱ्यांना मदत मिळण्यास कोणताच विलंब होणार नाही.

विशेष बाब म्हणून परड्रॉप मोर क्रॉप सुक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ८० टक्के अनुदान देण्यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.परभणी, लातूर संवाद विचार वाढवण्यासाठी जिल्ह्यात सांस्कृतीक सभागृह बांधन्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कमी पडणाऱ्या पावसामध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या जाती निर्माण करण्यासाठी मराठवाड्यातील कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. वार्षीक नियोजनासाठी प्रत्येक जिल्ह्यांनी केलेल्या वाढीव मागणीचा विचार करून त्यांना तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दुष्काळाची मदत तातडीने देण्यासाठी तत्पर
ऑक्टोंबर महिन्यात दुष्काळ जाहीर करणारी आमची पहिली सरकार असून आज पर्यंत जानेवारी, फेब्रुवारी नंतरच मागच्या सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी संवेदनशिल आहोत. बोंडअळी आणि अन्यशेतकऱ्यांसाठीचा पौसा आम्ही तात्काळ मिळावायासाठी प्रयत्न केला तसाच दुष्काळी मदत शेतऱ्यांना देण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे मंत्री मुनगंटीवार यावेळी म्हणाले.