महाराष्ट्रात आज ९ हजार ८९५ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये २९८ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर आता ३.७ टक्के इतका झाला आहे. तर महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये ६ हजार ४६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १ लाख ९४ हजार २५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या १७ लाख ३७ हजार प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३ लाख ४७ हजार ५०२ नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख ७४ हजार २६७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. ४५ हजार २२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला १ लाख ४० हजार ९२ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात ९ हजार ८९५ नव्या करोना रुग्णांची भर पडल्याने राज्यातील एकूण करोना बाधितांची संख्या ३ लाख ४७ हजार ५०२ झाली आहे असेही राजेश टोपे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या

मुंबई – २२ हजार ५९८
ठाणे- ३६ हजार ८५७
पुणे ४१ हजार ३५७
रायगड ५ हजार ४८१
कोल्हापूर १ हजार ७८३
औरंगाबाद ४ हजार ६९२
नाशिक ४ हजार ७४९
नागपूर १ हजार ३९३

महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या ३ लाखांच्या वर गेली आहे. घाबरुन जाऊ नका मात्र काळजी घ्या सुरक्षित राहा हे आवाहन सरकार, महापालिका प्रशासन यांच्यातर्फे करण्यात येतं आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, बाहेर पडताना मास्क वापरा, बाहेरुन घरात आल्यानंतर हँड सॅनेटायझरचा वापर करा, हात आणि पाय स्वच्छ धुवा या प्रकारच्या सूचना सरकार आणि प्रशासनातर्फे वारंवार देण्यात येत आहेत. तसंच सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळा, लक्षणं दिसल्यास तातडीने चाचणी करुन घ्या असंही सांगण्यात येतं आहे.