News Flash

वारकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार कान असून बहिऱ्यासारखं वागत आहे – दरेकर

या सरकारच्या संवेदना गोठल्या आहेत, असं देखील म्हणाले आहेत.

जे मंदिरांना टाळं लावू शकतात, त्यांना वारकऱ्यांची किती काळजी असेल? असा सवाल दरेकरांनी केला आहे. (संग्रहीत छायाचित्र)

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा दुसऱ्या वर्षीही पंढरपूरच्या आषाढी यात्रेवर कठोर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसेच, १७ ते २५ जुलैपर्यंत नऊ दिवस पंढरपूर व परिसरातील नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज अकलुज येथे माध्यमांशी बोलताना टीका विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. “वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे. या सरकारच्या संवेदना गोठल्या आहेत.” असं दरेकर म्हणाले आहेत.

करोना हे थोतांड! रस्त्यावर उतरून मंदिरांची कुलुपं तोडायला हवीत; संभाजी भिडे यांचं विधान

तसेच, “वारकऱ्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोनदा भूमिका मांडली. परंतु आता हे सरकार कान असून बहिऱ्यासारखं वागत आहे किंबहुना त्यांच्या संवेदनाच गोठल्या आहेत. यांच्या संवेदना असत्या तर आज आमची मंदिरं, देव-दैवतं कुलुपात राहिली नसती. यांनी काँग्रेसशी हात मिळवणी करून, आपले देव, देश, धर्म सगळं काही बासनात गुंडाळलं आहे. ेक” असं दरेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

“वारकरी देखील तयार होते की आम्ही सर्व निर्बंध पाळू, संख्येचे निर्बंध पाळू परंतु हेकेखोरपणे आम्हाला पाहिजे तसंच वागू, अशाच पद्धतीने वारकऱ्यांशी देखील सरकारचं वागणं राहिलेलं आहे.” असं देखील यावेळी दरेकर यांनी बोलून दाखवलं.

मोगलांना जमलं नाही ते ठाकरे सरकारनं करून दाखवलं – देवेंद्र फडणवीस

दरम्यान, २० जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्यादिवशी पहाटे अडीच वाजता विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय महापूजा होणार आहे. यात्रा काळात पूर्वापार प्रथा व परंपरेने चालत आलेले मंदिरातील विविध धार्मिक विधी जपण्याच्या दृष्टीने शासनाने परवानगी दिली आहे. २० जुलै रोजी आषाढी एकादशी असली तरी ११ जुलै ते २८ जुलैपर्यंत विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे. याचबरोबर, पंढरपुरात चंद्रभागा नदीत भाविक व वारकऱ्यांना करोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन स्नान करण्यास बंदी राहणार आहे. सार्वजनिक व खासगी वाहतुकीलाही बंदी राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 4:49 pm

Web Title: the state government is acting like a deaf person on the issues of warkaris darekar msr 87
टॅग : Pravin Darekar
Next Stories
1 VIDEO: पंकजा मुंडेंच्या भाषणाचा नेमका अर्थ काय?
2 ऑक्सिजन मास्क काढू नको सांगितलं म्हणून करोना रुग्णाने केला डॉक्टरवर हल्ला
3 Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
Just Now!
X