News Flash

राज्यात आणखी दोन ते तीन दिवस ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा जाणवणार!

राज्याचे अन्न आणि प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली पत्रकारपरिषदेत माहिती

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात एकीकडे करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणाला कोलमडत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी करोनाबाधितांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील रेमडेसिवीरचा साठा वाढण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अन्न व प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना सविस्तर माहिती दिली.

डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, “आपल्याला लागणारं रेमडेसिवीरचं इंजेक्शन हे कंपन्यांकडून जवळपास आज १२ हजार ते १५ हजार एवढं कमी मिळालेलं आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा अजूनही दोन ते तीन दिवस सहन करावा लागणार आहे.”

‘रेमडेसिवीर’साठी आता निर्यात बंदी असलेल्या कंपन्यांकडून माल घेण्याचे प्रयत्न सुरू – टोपे

तसेच, “नुकतीच माझी काही कंपन्यांच्या एमडी व सीईओंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. भविष्यात रेमडेसिवीरचा पुरवठा कशाप्रकारे त्या कंपन्यांच्या माध्यमातून ते वाढवून देतील? किती वाढवला जाणार आहे? कारण साधरण तीन आठवड्यांपूर्वी याच कंपन्यांच्या सीईओ व एमडींसोबत मी बैठक घेतली होती. त्यावेळेस मला त्यांनी पुढील १५ तारखेपर्यंतचा कार्यक्रम दिला होता. त्या कार्यक्रमानुसार दररोज ते महाराष्ट्रात ५५ हजार रेमडेसिवीर पुरवतील अशी ग्वाही त्यांनी दिली होती. परंत कालच्या तारखेपर्यंत सरासरी जर आपण पाहिली, तर ३७ ते ३९ हजारपर्यंतच त्यांनी रेमडेसिवीर पुरवलं आहे.” असंही डॉ.शिंगणे यांनी सांगितलं.

२० एप्रिल नंतर पुरवठा सुरळीत –
“ही सर्व आकडेवारी पाहता व दररोज रूग्णांची संख्या वाढत असताना आणि रूग्णांना रेमडेसिवीर देण्याच्या दृष्टीने आपण आपल्याला प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. त्यानुसार त्यांची व माझी चर्चा झालेली आहे. १९-२० एप्रिल नंतर हा पुरवठा सुरळीत होईल, अशा प्रकारचं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे.” असं डॉ. शिंगणे म्हणाले.

‘हाफकीन’च्या सहा लाख रेमडेसिवीर खरेदीच्या निविदेला शून्य प्रतिसाद!

याचबरोबर “केंद्र शासनाने अतिशय चांगला व महत्वपूर्ण निर्णय तीन- चार दिवसांअगोदर घेतला. रेमडेसिवीरची निर्यात बंदी त्यांनी केली हे खूप चांगल काम झालं आहे. यामुळे निर्यातीसाठी तयार असलेला रेमडेसिवीरचा मोठा साठा देशभरातील व काही महाराष्ट्रातील कंपन्यांकडे उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात या कंपन्यांना त्यांचा माल इथं विकण्यासाठी परवानगी देण्याबाबत आम्ही कालच बैठक घेतली आहे. शिवाय विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकरांशी देखील बोलणं झालं आहे. आता त्या कंपन्यांशी संपर्क साधण्याचं काम आमच्या विभागाकडून सुरू आहे.” अशी माहिती यावेळी शिंगणे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 4:24 pm

Web Title: the state will experience shortage of remedesivir for another two three days msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा…”; पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर
2 खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे; जितेंद्र आव्हाडांनी घेतली भाजपाची फिरकी
3 “बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल विझली, आता त्याचा धूर दिसतोय”, प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा!
Just Now!
X