News Flash

तेजस एक्सप्रेसची धडक लागून रेल्वेच्या तीन कामगारांचा मृत्यू

रेल्वे रुळ ओलांडत असताना तेजस एक्स्प्रेसने तिघांना धडक दिली

तेजस एक्स्प्रेसची धडक लागून तिघांचा झाल्याची घटना समोर आली आहे. पेण रेल्वे स्थानकावळील जिते गावाच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. हे तिघे रेल्वेचे कामगार होते. रविवारी रात्री हा अपघात झाला. मृतदेह पेणच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असून शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबीयांकडे सोपवण्यात येतील.

अशोक बारे (30), मानसिंग गुलकर (40) आणि अजय दांडोदिया (18) अशी मृतांची नावे आहेत. तिघेही रविवारी रात्री रेल्वे रुळ ओलांडत असताना तेजस एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. पेण आणि पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान असणाऱ्या जिते रेल्वे स्थानकाशेजारी हा अपघात झाला. तिघेही रेल्वेचे कंत्राटी कामगार होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 9:19 am

Web Title: three railway workers dies after tejas express ran over them
Next Stories
1 राफेल घोटाळ्यामुळे 56 इंचाच्या छातीत धडकी, भुजबळांचा मोदींना टोला
2 आर्थिक दुर्बल आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी
3 पाश्चात्त्यांचे अंधानुकरण म्हणजे आधुनिकीकरण नव्हे – डॉ. राणी बंग
Just Now!
X