21 September 2020

News Flash

प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा?, राष्ट्रवादीचा पूनम महाजन यांना सवाल

आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार... सभ्यता सोडायला एक मिनीटही लागत नाही, असा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत.

शरद पवार यांचा उल्लेख शकुनी मामा असा करणाऱ्या भाजपा खासदार पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने पलटवार केला आहे. ‘अहो चिऊ ताई, देश की जनता यह जानना चाहती है ?, प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा?’, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने पूनम महाजन यांना विचारला आहे. मुंबईत ठिकठिकाणी अशा आशयाचे पोस्टरच लावण्यात आले आहेत.

भाजपाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष पूनम महाजन यांनी चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर आयोजित केलल्या युवा महासंगम जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्यावर टीका केली होती. पूनम महाजन यांनी विरोधकांच्या महागठबंधनला महाठगबंधन असे संबोधून शरद पवार यांना शकुनी मामा म्हणून त्यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसही पूनम महाजन यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन पूनम महाजन यांच्यावर निशाणा साधला. ‘पूनमताई महाजन… स्व. प्रमोद महाजन आणि शरद पवार यांचे मैत्रीचे संबंध आपण कसे काय विसरलात ? राजकारणातील प्रसिद्धीसाठी आपण शरद पवारांबद्दल जे काही बोललात, त्याचे आम्हीही सभ्यता ओलांडून उत्तर देऊ शकतो. आपल्या वडिलांवर प्रविण महाजन यांनी का गोळ्या झाडल्या हे कदाचित जगाला माहित नसेल. पण, यामागील अंतर्गत राजकारण माहिती असलेला मी एक आहे. तेव्हा आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार… सभ्यता सोडायला एक मिनीटही लागत नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. ‘अहो चिऊ ताई… महाभारत, रामायण यांचे कथानक राहु द्या… देश की जनता यह जानना चाहती है ?, प्रवीणने प्रमोद को क्यों मारा?, असा सवाल या बॅनरद्वारे विचारण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 9:25 am

Web Title: why pravin killed pramod mahajan ncp banner in mumbai jitendra awhad slams poonam mahajan
Next Stories
1 मुंबईत २० फेब्रुवारीला शेतकऱ्यांचा लाँग मार्च, पुन्हा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा
2 शाळकरी मुलांची बस उलटून महाविद्यालयीन युवती ठार
3 शेतकऱ्यांच्या लेकींचे अन्नत्याग आंदोलन
Just Now!
X