News Flash

चिंताजनक! रायगडमध्ये दिवसभरात करोनामुळं २० जणांचा मृत्यू

जिल्ह्यात ३९१ नवे रुग्ण, तर ४८० जणांची करोनावर मात

संग्रहित छायाचित्र

रायगडकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. दिवसभरात जिल्ह्यात दिवसभरात करोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे. चोवीस तासात करोनाचे ३९१ नवे रुग्ण आढळून आलेत. तर ४८० जण उपचारानंतर पूर्ण बरे झालेत. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १४ हजार ८६३ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात ३९१ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील १६४, पनवेल ग्रामिणमधील ४६, उरणमधील २४, खालापूर ३२, कर्जत १५, पेण ३९, अलिबाग १७, मुरुड १, माणगाव १७, रोहा १७, सुधागड २, श्रीवर्धन २, महाड १५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत ६, पनवेल ग्रामिण १, खालापूर ३, कर्जत १, पेण ४, अलिबाग २, रोहा १, महाड २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४८० जण करोनातून पूर्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यातील ४७ हजार ८३७ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ३६८ रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ४००, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४०७, उरणमधील १७४, खालापूर २५९, कर्जत १०६, पेण २८५, अलिबाग १९६, मुरुड ४३, माणगाव ९३, तळा येथील १, रोहा १४४, सुधागड १८, श्रीवर्धन २९, म्हसळा ७०, महाड १२६, पोलादपूरमधील १७ करोनाबाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ७४ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 9:01 pm

Web Title: worrying in raigad 20 people died due to corona in a day aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सोलापुरात दोन महिन्यांत उच्चांकी ३११ मिमी पाऊस
2 चिंताजनक! महाराष्ट्रात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णनोंद, रुग्णसंख्या ४ लाख ११ हजार ७९८ वर
3 उस्मानाबाद : असमन्वयाचा फटका चिमुकल्यांना बसू नये; हवालदिल झालेल्या मातेची प्रशासनाकडे मागणी
Just Now!
X