वर्धा जिल्ह्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाचे १७ दरवाजे आज (शुक्रवार) सकाळी ६ वाजता ९० सेंमीने उघडण्यात आले. प्रकल्पातून १२५३.१६ घन.मी/से.पाणी विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.

नदी पात्राच्या दोनही काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे हिंगणघाट ते कुटकी व हिंगणघाट ते दाभा रोड बंद झाले आहेत. कार नदी प्रकल्पही आज सकाळी ६.३० वाजता शंभर टक्के भरले.

नागपूर : अजनीत भिंत कोसळून एकाचा मृत्यू ; अनेक ठिकाणी गृहप्रकल्प जलमय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोन दिवस अधूनमधून विश्रांती घेणारा पाऊस गुरुवारी रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार कोसळायला सुरुवात झाली आहे. नागपुरातील अजनी परिसरात भिंत कोसळून एक जण ठार झाल्याची माहिती आहे. पावसाच्या विश्रांतीमुळे रस्त्यावर साचलेले आणि वस्त्यांमध्ये शिरलेले पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असतांना नवीन पावसाने शहरातील परिस्थिती पुन्हा जलमय झाली.