वाई:वाई तालुक्यात शुक्रवारी रात्री पसरणी, कुसगांव, ओझर्डे,सिद्धनाथवाडी येथे एकाच रात्रीत २४ बंद घरे फोडून सोने व रोख रकमेसह लाखोंचा ऐवज  लंपास केला.याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम शनिवारी सायंकाळ पर्यत सुरु होते.त्यामुळे  चोरट्यांना शोधण्याचे  आव्हान पोलिसांना दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी मध्यरात्री पसरणी (११), कुसगांव (४), ओझर्डे(५),सिद्धनाथवाडी(४) येथील २४ बंद घरांची कुलपे तोडून सोने व रोख रकमेसह मोठा ऐवज लंपास केला. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांनाच चोरट्यांनी आव्हान दिले आहे.यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले असून संतापाची लाट उसळली आहे. वाई तालुक्यातील चोरीच्या घटना घडलेल्या गावांतील घरे बंद होती. या घरातील लोक हे कामानिमित्त पुणे, मुंबई येथे राहतात अशाच घरांना चोरट्यांनी लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. एका रात्रीत सर्वाधिक घरे फोडण्याची ही तालुक्यातील पहिलीच मोठी घटना आहे.

हेही वाचा >>> गगनचुंबी ताबूतांच्या भेटीने कडेगावचा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मोहरम संपन्न

या चोऱ्यामागे सराईत गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, तसेच सर्वच घरे बंद असल्याने मारहाण व जबरदस्तीच्या घटना घडल्या नाहीत. रात्री झालेल्या चोऱ्यांची माहिती शनिवारी सकाळी  पोलीस पाटलांनी पोलीस ठाण्यात दिली.ताबडतोबीने पोलिस ठाण्याचे अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच शॉन पथक, फिंगर प्रिंट टीम, स्थानिक गुन्हे अन्वेषण व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पथक, घटना स्थळी दाखल झाले.या चोरट्यांनी रेकी करून वाई व भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीत घरफोड्या केल्याने पोलीसदल हादरून गेले.भुंकणाऱ्या कुत्र्यांना जखमी केल्याचे निदर्शनास आले . यामुळे  ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले असून संतापाची लाट उसळली आहे.चोरट्यांनी यासाठी दुचाकींचा वापर केल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा >>> “विरोधामुळे नाणारचा प्रकल्प पाकिस्तानमध्ये चालला”, शेलारांच्या विधानाला ठाकरे गटातील नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले…

घटनास्थळी  अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर,परिविक्षाधीन  अप्पर पोलीस अधीक्षक कमलेशकुमार मीना,पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे(वाई) भुईंज चे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे आदींनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी टीम रवाना केल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 housebreaking theft case in one night in wai taluka zws
First published on: 29-07-2023 at 19:34 IST