राज्यात आज दिवसभरात २८ हजार २८६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ३६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८ टक्के एवढा आहे. याशिवाय आज राज्यात २१ हजार ९४१ रूग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ७०,८९,९३६ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.०९ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण २,९९,६०४ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ७५,३५,५११ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४२१५१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,३५,११,८६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७५,३५,५११(१०.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,३५,१४१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३ हजार ४०२ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओमायक्रॉन बाधित रूग्ण –

आज राज्यात ८६ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रूग्ण आढळले आहेत. हे सर्व राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. यामध्ये नागपूर – ४७, पुणे मनपा -२८, पिंपरी-चिंचवड मनपा – ३, वर्धा- २ तर मुंबई, अमरावती, यवतमाळ, भंडारा, ठाणे मनपा आणि पुणे ग्रामीण प्रत्येकी एक जण आढळला आहे. आजपर्यंत राज्यात एकूण २ हजार ८४५ ओमायक्रॉन विषाणू बाधित रूग्ण रिपोर्ट झाले आहेत.
यापैकी १४५४ रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ६ हजार ३२८ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्यांपैकी ६ हजार २२३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १०५ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.