जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी रविवारी १ हजार ८१५ केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली असून यापैकी ३२७ केंद्र संवेदनशील तर २० मतदान केंद्रेअतिसवंदेनशील असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. ४४७ पैकी ३१ ग्रामपंचायतीच्या अविरोध निवडी झाल्या असून ४१६ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्ह्यात ४४७ ग्रामपंचायतीमध्ये १ हजार ६१४ प्रभाग तर सरपंच पदासह ४ हजार ७१९ सदस्य संख्या आहे.  या निवडणुकीसाठी  एकूण १० लाख ९० हजार ४२४ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ५ लाख ६४ हजार ६०८ पुरूष मतदार, ५ लाख २५ हजार ८०६ स्त्री मतदार तर इतर १० मतदार आहेत. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहन व्यवस्था  व  एकूण १० हजार २५७ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क निर्भय व नि:पक्षपणे बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 327 sensitive and 20 highly sensitive polling stations in gram panchayat elections in sangli district zws
First published on: 16-12-2022 at 19:12 IST