महाराष्ट्रात ८ हजार ३०८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील चोवीस तासांमध्ये २५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात २ हजार २१७ रुग्ण बरे होऊन घरी झाले आहेत. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६० हजार ३५७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ५४.८१ टक्के इतका झाला आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा ३.९१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १४ लाख ८४ हजार ६३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २ लाख ९२ हजार ५८९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या राज्यात ७ लाख २४ हजार ६०२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४४ हजार २८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात समोर आलेल्या संख्येनुसार आज १ लाख २० हजार ४८० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ८ हजार ३०८ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ही २ लाख ९२ हजार ५८९ इतकी झाली आहे.

प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई – २३ हजार ९४८
ठाणे – ३६ हजार ४६८
पुणे – २९ हजार ५८३
रायगड – ५ हजार १५०
कोल्हापूर- ६८५
नाशिक- ३ हजार ३९२
औरंगाबाद- ३ हजार ८९२
नागपूर- ९६७

मुंबईच्या तुलनेत ठाण्यात आणि पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. हेच ही संख्या सांगते आहे. दरम्यान मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली या ठिकाणी लॉकडाउनही वाढवण्यात आला आहे. आजच सोलापूर आणि कोल्हापूर या दोन्ही शहरांमधलाही लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, मास्क लावा. बाहेरुन घरात आल्यावर सॅनेटायझर वापरा, हातपाय धुवा करोनाला घाबरु नका पण काळजी घ्या हे आवाहन सातत्याने करण्यात येते आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8308 new covid19 positive cases and 258 deaths have been reported in maharashtra today scj
First published on: 17-07-2020 at 19:53 IST