धाराशिव, दि. ५

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोहारा तालुक्यातील भूकंपप्रवण भागात बुधवारी सायंकाळी ४:३२ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. लातूर येथील भूकंप मापन केंद्रावर १.८ रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू सास्तूरनजीक असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील १० पेक्षा अधिक गावांत हा भूकंप जाणवला. कोणत्याही प्रकारचे नुकसान या भूकंपामुळे झालेले नाही.

सन १९९३ साली झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाच्या आठवणींनी आजही उमरगा आणि लोहारा तालुक्यातील नागरिक भावुक होतात. याच भूकंप प्रवण क्षेत्रातील लोहारा तालुक्यात बुधवारी सायंकाळी ४:३२ वाजण्याच्या सुमारास जमीन हादरली. तालुक्यातील सास्तूर, होळी, उर्शदपूर, तावशी, माकणी, गुबाळ, राजेगाव, रेबेचिंचोली, उदतपूर आदी गावांमध्ये भूकंपाचा हादरा जाणवल्याने नागरिक भयभीत झाले. अनेकांनी घरातून बाहेर पळ काढला.

हेही वाचा… सांगली: कवलापूर विमानतळाला तत्वतः मंजुरी

सन १९९३ च्या भूकंपानंतर या भागात शंभर टक्के पुनर्वसन झालेले आहे. त्यामुळे भूकंपरोधक घरांमध्ये सध्या नागरिकांचे वास्तव्य आहे. मात्र यापूर्वी झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपात हजारो नागरिकांनी आपला जीव गमावला होता. त्या दुःखाच्या जखमा आजही अनेकांच्या काळजावर जीवंत आहेत. अनेकांना त्यामुळे अनाथ आयुष्य वाट्याला आले होते. या सौम्य भूकंपाने त्या आठवणीच्या वेदना जाग्या केल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A mild tremor was felt in the earthquake prone area of lohara taluka dvr
First published on: 05-07-2023 at 18:31 IST