वाई : समाज माध्यमावर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणारा कोणी मास्टर माईंड असेल तर त्याला शाेधून काढू असे आश्वासन आज (गुरुवार) पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवप्रेमींना सातारा येथे दिले. समाज माध्यमावर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्याचे निदर्शनास आल्याने साताऱ्यात हिंदुत्ववादी तरुण आक्रमक झाले . त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत वादग्रस्त स्टेट्स ठेवणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.  निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्या आश्वासनानंतरही हिंदूत्ववादी कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोराच्या रस्त्यावर रास्ता राेकाे आंदाेलन करुन निषेध नाेंदविला.

अल्पवयीन युवकाच्या मोबाईला वापर करून त्याच्या मोबाईलवर आक्षेपार्ह  स्टेट्स ठेवल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते.  त्यावेळी कार्यकर्त्यांनी  सातारा शहर पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्याकडे संबंधित तरुणावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर  पोलिसांनी त्या युवकास ताब्यात घेतले होते. त्याचा मोबाईलही सातारा पोलिसांनी हस्तगत केला होता. त्याची चौकशी सुरू असताना पुन्हा गुरूवारी सकाळी वादग्रस्त स्टेट्स असल्याची बातमी क्षणाधार्थ सगळीकडे पसरली.त्यामुळे  युवक, कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जमा होवू लागले.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी झाली.  जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या तरुणास अटक करण्याची मागणी केली.

हेही वाचा >>> सांगली : शासन आपल्या दारी म्हणजे एक दिवसीय इव्हेंट – अशोक चव्हाण

युवकांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची  निवासस्थानी  भेट घेतली. यावेळी देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणा-यावर कठाेर कारवाई केली जाईल असे शिवप्रेमींना आश्वासित केले.पालकंमत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर  शांतता झाली. पालकमंत्री देसाई म्हणाले, यापूर्वी देखील काही अल्पवयीन मुलांना हाताशी धरुन महापुरुषांची बदनामी करण्याचा प्रकार घडला आहे. सायबर विभागातील वरिष्ठ अधिका-यांकडून या प्रकरणाचा तपास केला जाईल. दोन समाजात तेढ निर्माण करणारा काेणी मास्टर माईंड असेल तर त्याला शाेधून काढून त्याच्यावर कायदेशिर कारवाई केली जाईल असेही नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान साताऱ्यात सामाजिक कार्यकर्ते  फिरोज पठाण यांचे कार्यालयाची अज्ञातांनी  तोडफोड केली. या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाया अनुषंगाने  सातारा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. जलद कृती दलो जवान, पोलीस जवान, स्थानिक गुन्हे अन्वेषणो जवान त्यांच्या कार्यालयाभावेती तैनात होते.