अलिबाग – गेल्या काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यात माकडांचा नागरी वस्त्यांमधील उपद्रव वाढला आहे. अन्नाच्या शोधात माकडांच्या आणि वानरांच्या टोळ्या गावात शिरत असल्याचे दिसून येत आहे. या माकडांचा उपद्रव थांबवायचा कसा हा प्रश्न बागायतदारांना पडला होता. आता फटाक्यासारखा आवाज करणारे एक यंत्र काही शेतकऱ्यांनी विकसित केले आहे. देशी जुगाड करून बनविण्यात आलेल्या या यंत्राची सध्या रायगड जिल्ह्यात धडाक्यात विक्री सुरू आहे.

शेतशिवारात माकडांचा उपद्रव वाढला आहे. शेती बागायतींचे नुकसान करीत आहेत. रायगड जिल्ह्यात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मुरुड, रेवदंडा, अलिबाग, दिवेआगर, श्रीवर्धन या सारख्या आंबा-नारळाच्या बागा असलेल्या शहरांमध्ये हा उपद्रव वाढतच चालला आहे. नागरी वस्तीत विपुल प्रमाणात अन्न मिळत असल्याने माकड-वानरांच्या संख्येत भयंकर वाढ होत आहे.

increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार

हेही वाचा – मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी यांना ‘या’ योजनेचा आनंद अन् दुःखही, गडकरींनी सांगितला होता किस्सा

मोठे आवाज झाले तर ही उपद्रवी माकडे पळून जातात त्‍यासाठी अनेक ठिकाणी फटाके वाजवले जातात. पण फटाक्यांची उपलब्धता वर्षभर होत नसल्याने बागायतदारांची मोठी अडचण होत होती. ही समस्या आता दूर झाली आहे. प्‍लास्‍टीकच्‍या पाइपपासून बनवलेले पिचकारीसारखे छोटेखानी यंत्र बाजारात दाखल झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे हे यंत्र शेतकऱ्यांच्‍या पसंतीस उतरत आहे. प्‍लास्‍टीकच्‍या पाइपचा छोटा तुकडा घेवून तो दोन्‍ही बाजूने बंदिस्‍त केलेला असतो. पाइपवर एक छिद्र पाडून त्‍यातून कॅल्शियम कार्बाईडचे तुकडे टाकले जातात. त्‍यात थोडं पाणी ओतून झाकण बंद केले जाते. हा पाइप हलवला की त्‍यात अँसिटीलीन गॅस तयार होतो. या गॅसवर पाईपच्‍या एका बाजूने असलेल्‍या बटणाने दाब दिला की गॅस बाहेर पडतो. गॅस बाहेर पडत असताना फटाक्‍यासारखा मोठा आवाज होतो. या आवाजाने माकडे घाबरून पळून जातात. बाजारात हे यंत्र अवघ्‍या २०० रुपयाला विकले जात आहे. ज्याला प्रचंड मागणी होताना दिसते आहे.

हेही वाचा – मनोहर जोशी : सारीच सर्वोच्च पदे भूषविण्याची संधी मिळालेले नेते

माकड- वानरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. घरांवर उड्या मारल्याने घराची कौले सातत्याने तुटतात, त्यांची दुरुस्ती न केल्यास घराचेही नुकसान होते. त्याचबरोबर फळबागांचे नुकसान तर न मोजण्याइतके आहे. जितकी मेहनत करावी तितकी मेहनत वाया जाते. यापासून दिलासा मिळावा म्हणून वनविभागाने प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. म्हणजे असे देसी जुगाड वापरण्याची गरज भासणार नाही. – सिद्धेश राऊत, आंबा बागायतदार- आक्षी