राज्यात आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावरून इक्बालसिंग चहल यांना नुकतंच हटवण्यात आलं आहे. ही जागाही रिक्त आहे. परंतु, अद्याप या जागेवर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. तर, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी असलेल्या आश्विनी भिडे यांचीही बदली करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजीत बांगर हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त होते. तिथून त्यांची बदली आता मुंबई महापालिकेत करण्यात आली आहे. तर, मेट्रो वुमेन म्हणून ओळख असलेल्या आश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालपदी बदली करण्यात आली आहे. आश्विनी भिडे या मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी होत्या. त्यांच्या जागी आता अमित सैनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Mumbai, parks, misused, mnc,
मुंबई : १२ उद्यानांचा गैरवापर होत असताना पालिकेची डोळेझाक
Vendors throw vegetables, Protest against nmc, Nashik Municipal Corporation, Demand Space for Business, nashik news, vendors protest news, marathi news, protest in nashik,
नाशिक महापालिकेसमोर भाजीपाला फेकून आंदोलन – अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा निषेध
appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर

बुलढाण्याच्या जिल्हाधिकारीपदी अंकित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगावच्या जिल्हाधिकारीपदी शुभम गुप्ता, तर धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून विशाल नरवडे यांची बदली करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनाही पदावरून हटवण्यात आलं असून अद्याप त्यांची इतर जागेवर बदली करण्यात आलेली नाही. तर, नागपूरच्या NMRDA च्या आयुक्तपदी संजय मीना यांची नियुक्ती करण्यात आली असून मनोजकुमार सुर्यवंशी यांनाही पदावरून हटवण्यात आलं असून ते बदलीच्या प्रतिक्षेत आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने महानगरपालिकांमधील आयुक्त, अतिरिक्त आयक्त आणि उपायुक्त या पदावरील अधिकार्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.