यवतमाळमध्ये रविवारी (४ डिसेंबर) एका एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. कार अमरावतीकडे जात होती, तर एसटी बस यवतमाळकडे जात होती. यावेळी यवतमाळच्या नेरजवळील लोणी गावाजवळ कार आणि बसची भीषण धडक झाली.

या घटनेत राजेश इंगोले (यवतमाळ), रजनी इंगोले (यवतमाळ), वैष्णवी गावंडे (वाशिम) आणि सारीखा चौधरी (पुसद, यवतमाळ) या चौघांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील चौघे जागीच ठार झाले. बसमधील १३ जण गंभीर जखमी झाले.

हेही वाचा : धुळे: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला अपघात; दोघांचा मृत्यू तर २५ जण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेर येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.