scorecardresearch

Premium

नाशिकमध्ये भाजीपाला पिकअप आणि लग्झरीत भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातील तताणी, श्रृंगारवाडी येथून नाशिकच्या दिशेने शेतकऱ्यांसह भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअप (MH 41AU 2192) आणि एका लग्झरी बसचा भीषण अपघात झाला.

Nashik vegetable pick up luxary accident
नाशिकमधील पिकअप आणि लग्झरी बसचा अपघात

नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातील तताणी, श्रृंगारवाडी येथून नाशिकच्या दिशेने शेतकऱ्यांसह भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअप (MH 41AU 2192) आणि एका लग्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. लग्झरी बस (RJ 27 PB 26580) नाशिककडून सापुताराकडे जात होती. यावेळी सुरगाणा तालुक्यातील बोरगाव जवळील चिखली येथे पिकअपला जोरदार धडक दिली.

पिकअपमधील तताणी, शृंगारवाडी व घागरबूडा गावातील तीन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तताणी येथील एकाचा रूग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यात मृत्यू झाला. काही गंभीर जखमी आहेत. तताणी गावातील दोन तरूण शेतकऱ्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. अपघात इतका भीषण होता की पिकअपच्या चालकाच्या बाजूकडील मागचा साटा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त
marathi women denied flat in mulund west viral video
“महाराष्ट्रीयन अलाऊड नाही” म्हणणाऱ्या बाप-लेकानं मराठी महिलेची मागितली माफी; नेमकं घडलं काय होतं? पाहा Video!

हेही वाचा : अहमदनगरमध्ये वादळी पावसाने घर कोसळलं, संगमनेरमधील एकाच घरातील तिघांचा मुत्यू

या घटनेची माहिती कळताच घरचे नातेवाईक घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती कळताच सूरगाणा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची चौकशी करून पिकअपमधील जखमींना तातडीने उपचारासाठी बोरगाव येथे हलविण्यात आले. या घटनेतील बसचालक सुरगाणा पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेची पुढील चौकशी सूरगाणा पोलीस करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accident between vegetable pick up and luxury bus in kalwan nashik pbs

Live Express Adda With MoS Rajeev Chandrasekhar

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×