पुणे : सातारा जिल्ह्यातून कोपरखैरणे येथे निघालेल्या इको कार आणि ट्रकचा अपघात झाला. इको कार मधील प्रवास संपेकी एक महिला आणि एक पुरुष असे दोन जण मयत तर किरकोळ तसेच गंभीर जखमी झालेल्या दहा जणांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या कोंढावळे येथून कोपरखैरने नवी मुंबई येथे मारुती इको कारने ड्रायव्हर आणि अन्य 15 जण निघाले होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईच्या दिशेने माडप बोगद्या जवळ सदर कार आली असता KA 56 – 2799 हा ट्रक रस्त्याच्या कडेला आपला पंक्चर झालेला टायर बदलण्यासाठी उभा होता त्याला कारने मागून धडक दिली. धडक एवढी गंभीर होती की, इको कार मधील सर्वच प्रवाशांना इजा झाली.

त्यातील महिला लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर, वय -24 व गणेश बाळू कोंढाळकर, वय -22, रा. कोंढावळे, ता. वाई, जिल्हा – सातारा यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर जखमी प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे त्यातील सहा ते सात जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत त्यांची प्रकृती नाजूक आहे. रात्री दोन वाजताचे सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक कोळंबली होती. इको कार मधील जखमींना बाहेर काढण्यासाठी आय आर बी पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणेला मोठी शिकस्त करावी लागली.

हेही वाचा : विश्लेषण : म्हाडा सोडतीत बदल? आता तपासली जाणार अर्जदारांची पात्रता!

अपघात झाल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणेंसोबत डेल्टा फोर्स, लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स, पळस्पे वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस, खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले होते.
सदर अपघाताची भीषणता लक्षात घेत खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला आणि खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाळा कुंभार यांनी घटनास्थळाला भेट दिली तसेच एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

हेही वाचा : हिंदूराष्ट्र सेनेच्या तुषार हंबीर यांच्यावर ससून रुग्णालयात कोयत्याने हल्लाचा प्रयत्न; पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधनाने वाचला जीव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इको कारचा चालक अंकुश राजाराम जंगम वय – 32 यांने लेनची शिस्त न पाळता, भरधाव वेगाने कार चालवल्याने हा अपघात झाल्याचे कारप्राथमिक स्वरूपात पुढे आले आहे. पोलीस यंत्रणा या बाबत अधिक चौकशी जरी करत असली तरी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अति वेगाने कार चालवल्याने झालेल्या या भीषण अपघाताचे स्वरुप पाहता सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.